Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवसभरात किती पाण्याचे सेवन करावे? शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर ‘या’ अवयवांमध्ये होतात तीव्र वेदना

शरीराला हेल्दी राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. दिवसभरात २ ते ३ लीटर पाण्याचे सेवन केल्यास तुम्ही कायमच हायड्रेट आणि फ्रेश राहाल. जाणून घ्या कमी पाणी प्यायल्यामुळे कोणत्या अवयवांमध्ये वेदना होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 11, 2025 | 05:30 AM
दिवसभरात किती पाण्याचे सेवन करावे? शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर 'या' अवयवांमध्ये होतात तीव्र वेदना

दिवसभरात किती पाण्याचे सेवन करावे? शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर 'या' अवयवांमध्ये होतात तीव्र वेदना

Follow Us
Follow Us:
  • दिवसभरात किती लीटर पाण्याचे सेवन करावे?
  • शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास कोणते पेय प्यावेत?
  • शरीरातील पाणी कमी झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसू लागतात?
अन्न, पाणी, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. त्यातील अत्यंत महत्वाची गरज म्हणजे पाणी. अन्नपदार्थांशिवाय माणूस पाण्यावर २१ दिवस जिवंत राहू शकतो. शरीर कायमच हायड्रेट आणि निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. दिवसभरात २ ते ३ लीटर  पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्याचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते. पण शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. पाण्याची कमतरता आजारांना निमंत्रण देते. त्यामुळे दिवसभरात शक्य होईल तितके पाण्याचे सेवन करावे. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर पचनक्रिया बिघडण्यासोबतच शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दिवसभरात किती पाणी प्यावे? पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर कोणत्या अवयवांमध्ये वेदना होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

रात्री खाल्लेल्या ‘या’ पदार्थांमुळे वाढतो फॅटी लिव्हरचा धोका, इन्सुलिनची पातळी वाढून शरीराचे होईल गंभीर नुकसान

दिवसभरात किती लीटर पाणी प्यावे:

शरीराला पाण्याची कायमच आवश्यकता असते. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि आरोग्यासंबंधित गंभीर आजारांची लागण होत नाही. दिवसभरात कमीत कमी २ ते ३ लीटर पाणी प्यावे. यासोबतच वेगवेगळ्या फळांच्या रसाचे किंवा शरीराला ऊर्जा देण्याऱ्या घरगुती पेयांचे सेवन करावे. तसेच बाहेर उन्हात काम करण्याऱ्या लोकांनी ३ लीटर पेक्षा जास्त पाणी प्यावे. भरपूर पाण्याचे सेवन केल्यामुळे पचन सुधारण्यासाठी, वजन कमी होते, शरीराला ऊर्जा, त्वचेवरील तेज कायमच टिकून राहते.

पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर ‘या’ अवयवांमध्ये होतात वेदना:

पोटात दुखणे:

दिवसभरात शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात पाण्याचे सेवन न केल्यामुळे पोटात तीव्र वेदना होतात. तसेच ऍसिडिटी, अपचनाच्या समस्या वाढून संपूर्ण शरीराचे कार्य बिघडते. पाण्याच्या कमतरतेमुळे किडनी स्टोन किंवा किडनीसंबंधित आजारांची लागण होण्याची शक्यता असते. किडनीमध्ये स्टोन झाल्यानंतर पोटात तीव्र वेदना जाणवू लागतात. तसेच पाण्याच्या कमतरतेमुळे डोकेदुखीचा त्रास देखील होतो. त्यामुळे नियमित २ ते ३ लीटर पाण्याचे सेवन करावे.

सांध्यांमधून कायमच कटकट आवाज येतो? ‘या’ तेलाने करा संपूर्ण शरीराला मालिश, ५ मिनिटांमध्ये मिळेल कायमचा आराम

सांधेदुखी आणि स्नायूंमधील वेदना:

बऱ्याचदा सकाळी उठल्यानंतर सांध्यांमध्ये वेदना किंवा हाडांमध्ये वाढू लागतात. या वेदना पाण्याच्या कमतरतेमुळे होण्याची शक्यता असते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर हाडे आणि स्नायूंचे आरोग्य बाधित होते, ज्यामुळे हाडांमध्ये वेदना किंवा मसल्समध्ये वेदना वाढू लागतात. डिहायड्रेशन झाल्यानंतर लघवीमध्ये सुद्धा गंभीर लक्षणे दिसू लागतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाणी पिण्याचे फायदे काय आहेत?

    Ans: शरीरातील प्रत्येक अवयवाच्या आणि पेशीच्या योग्य कार्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.

  • Que: पाणी कसे प्यावे?

    Ans: दिवसभरात सुमारे २ ते ३ लिटर (सुमारे ८ ग्लास) पाणी प्यावे.

  • Que: पाणी शुद्ध कसे करावे?

    Ans: पाणी उकळणे हा एक प्रभावी मार्ग आहे.

Web Title: How much water should be consumed during the day severe pain occurs in these organs after lack of water in the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • drinking water tips
  • Health Care Tips
  • health issue

संबंधित बातम्या

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल
1

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
2

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
3

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
4

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.