Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Postmortem: पोस्टमार्टमने कसं समजतं मृत्यूचं कारण? जाणून घ्या कशाप्रकारे शरीराचे अवयव देत असतात संकेत…

How Postmortem Finds Death Reason : अकस्मात किंवा संशयास्पद मृत्यू झाल्यास मृत्यूचे मूळ कारण शोधण्यासाठी पोस्टमार्टम प्रक्रियेची मदत घेतली जाते. ही मेडिकल प्रक्रिया कशी काम करते ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: May 31, 2026 | 08:15 PM
Postmortem: पोस्टमार्टमने कसं समजतं मृत्यूचं कारण? जाणून घ्या कशाप्रकारे शरीराचे अवयव देत असतात संकेत...

Postmortem: पोस्टमार्टमने कसं समजतं मृत्यूचं कारण? जाणून घ्या कशाप्रकारे शरीराचे अवयव देत असतात संकेत...

Follow Us
Follow Us:
  • मृत्यूनंतर शरीरातील विविध बदल तज्ज्ञांना महत्त्वाचे संकेत देतात.
  • तपासणीदरम्यान बाह्य आणि अंतर्गत दोन्ही स्तरांवर बारकाईने निरीक्षण केले जाते.
  • काही निष्कर्षांसाठी प्रयोगशाळेतील चाचण्यांची मदत घेतली जाते, त्यामुळे अहवाल येण्यास वेळ लागू शकतो.
पोस्टमार्टम ज्याला मराठीत शवविच्छेदन म्हटलं जातं, ही फक्त एक मेडिकल प्रक्रिया नसून याच्या मदतीने मृत्यूच्या खऱ्या कारणापर्यंत पोहचण्यास मोठी मदत मिळते. जेव्हा कोणत्याही व्यक्तीचा अचानक किंवा संशयास्पद मृत्यू होतो तेव्हा त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला जातो. याद्वारे डाॅक्टर मृताच्या सर्व महत्त्वपूर्ण अवयवांचा बारकाईने तपास करतात. या चाचणीतच व्यक्तीचा मृत्यू नेमका कोणत्या कारणावरुन झाला ते उघड होते. याच्या मदतीने गुन्हेगारांना शोधण्यात पोलिसांची फार मदत होते. पण तुम्ही कधी हा विचार केलाय का पोस्टमार्टमच्या या प्रक्रियेत नक्की असं काय केलं जात असेल की मृत्येचे खरे कारण उघड होते. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Lifestyle Tips : महिलांच्या तुलनेत पुरुषांचे आयुष्य कमी का असते? दीर्घायुष्यामागे नक्की काय कारण दडलंय? जाणून घ्या सविस्तर

कसं समजतं मृत्यूचं कारण?

नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या मेडिकल एक्सपर्ट्सने सांगितले की, शरीरातील प्रत्येच अवयव हा मृत्यूपूर्वीच्या स्थितीबद्दल काही ना काही सांगत असतो. उदाहरणार्थ, जर हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळे, सूज किंवा रक्ताच्या गुठळ्या दिसून आल्या तर व्यक्तीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे मानले जाते. याचबरोबर जर फुफ्फुसांमध्ये पानी भरले असेल किंवा इन्फेक्शन आणि जळजळ होत असेल तर याचा अर्थ व्यक्तीचा गुदमरुन किंवा विषारी वायूने मृत्यू झाला असावा. ब्रेनची तपासणी देखील पोस्टमार्टम चाचणीत महत्त्वाची भूमिका बजावते. जर व्यक्तीच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असेल, किंवा डोक्याला सूज असेल तर एक्सपर्ट्स याला स्ट्रोक किंवा डोक्यावर झालेल्या बाह्य हल्ल्याशी कारण जोडतात. याबरोबरच जर लिव्हर आणि किडनीची स्थिती दर्शवते की व्यक्तीने विषाचे किंवा ड्रग्सचे अतिसेवन केले आहे.

चाचणीत वेळ का लागतो?

खरंतर पोस्टमार्टम करताना फक्त डोळ्याने पाहून कोणताही निर्णय घेतला जात नाही. याच अनेकवेळी अवयव आणि टिश्यूचे काही सॅम्पल घेऊन लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठवले जाते. तिथे माइक्रोस्कोप आणि केमिकल टेस्ट केल्यानंतर आजार, इन्फेक्शन, विष किंवा शरीरातील अंतर्गत हानीची माहिती मिळते. हेच कारण आहे की, काही प्रकरणांमध्ये पोस्टमार्टम रिपोर्ट येण्यात आठवड्याभराचा कालावधी लागतो. ब्रिटनच्या रॉयल ​​कॉलेज ऑफ पॅथॉलॉजिस्ट’ आणि ‘ह्युमन टिशू अथॉरिटी’च्या मते, पोस्टमार्टम फक्त मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी नाही तर आजारांना आणखी चांगल्या पद्धतीने समजून घेण्यास आणि भविष्यात त्यावर प्रभावी उपचार करण्यास मदतीचे ठरते.

Travel : पिसफुल डेस्टिनेशनच्या नावाने लोकप्रिय होत आहे हे ठिकाण; गर्दीपासून दूर… कुठे वसले आहे ते जाणून घ्या

लहान-सहान गोष्टींचीही तपासणी होते

डाॅक्टर सांगतात की, शरीरावरील लहान-सहान खुणा देखील या रिपोर्टमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. त्वचेचे रंग बदलणे, नखं निळी पडणे, शरीरावर जखमा किंवा गळा दाबल्याचे चिन्ह मृत्यूचे खरे कारण समजून घेण्यास मदत करते. अनेकदा बाहेरील जखमा आणि अंतर्गत अवयवांची स्थिती तपासून मृत्यू नैसर्गिक, अपघाती किंवा गुन्हेगारी स्वरूपाचा होता हे शोधून काढले जाते. पोस्टमार्टम केल्यानंतर, पॅथोलाॅजिस्ट आपला सविस्तर रिपोर्ट तयार करतात ज्यात मृत्यूचे संभाव्य कारण, शरीराच्या आत मिळालेले संकेत आणि लॅब टेस्टचे निकाल यांचा समावेश असतो. हाच रिपोर्ट पुढे पोलिसांच्या तपासात आणि कायदेशीर कारवाईत एक महत्त्वाचा पुरावा म्हणून वापरला जातो.

 

Web Title: How postmortem determines cause of death and what body organs reveal lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Death
  • Health Tips
  • lifestyle news
  • Medical

संबंधित बातम्या

प्रथम ‘भारतकेसरी’ ओम्या बैलाचे निधन; मावळ तालुक्यातील बैलगाडा मालक अन् चाहत्यांकडून हळहळ व्यक्त
1

प्रथम ‘भारतकेसरी’ ओम्या बैलाचे निधन; मावळ तालुक्यातील बैलगाडा मालक अन् चाहत्यांकडून हळहळ व्यक्त

Menstrual Cycle: मासिक पाळीच्या अचूक वेळापत्रकासाठी Apps चा वापर करताय? डोक्याला होऊ शकतो त्रास
2

Menstrual Cycle: मासिक पाळीच्या अचूक वेळापत्रकासाठी Apps चा वापर करताय? डोक्याला होऊ शकतो त्रास

FMGE Exam: मेडिकलच्या विद्यार्थ्यांचे जंतर मंतरवर आंदोलन; जाणून घ्या नेमक्या काय आहेत उमेदवारांच्या मागण्या?
3

FMGE Exam: मेडिकलच्या विद्यार्थ्यांचे जंतर मंतरवर आंदोलन; जाणून घ्या नेमक्या काय आहेत उमेदवारांच्या मागण्या?

Pimpari-Chinchwad : वर्षभरात पुन्हा घडली दुर्घटना; बीएसएनएलच्या भूमिगत डक्टमध्ये दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू
4

Pimpari-Chinchwad : वर्षभरात पुन्हा घडली दुर्घटना; बीएसएनएलच्या भूमिगत डक्टमध्ये दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.