Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नासाठी रेल्वेचे संपूर्ण कोच बुक करायचे आहे? अशाप्रकारे करा बुकिंग; जाणून घ्या किती खर्च येईल…

How To Book Train Coach : तुम्हालाही माहितीये का? तुम्ही लग्नासाठी किंवा कोणत्या खास प्रसंगासाठी रेल्वेचे कोच किंवा संपूर्ण ट्रेन बुक करु शकता. यासाठीची बुकिंग प्रोसेस आणि डिपाॅजिट शुल्क किती ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 14, 2026 | 08:15 AM
लग्नासाठी रेल्वेचे संपूर्ण कोच बुक करायचे आहे? अशाप्रकारे करा बुकिंग; जाणून घ्या किती खर्च येईल...

लग्नासाठी रेल्वेचे संपूर्ण कोच बुक करायचे आहे? अशाप्रकारे करा बुकिंग; जाणून घ्या किती खर्च येईल...

Follow Us
Follow Us:
  • खासगी समारंभ किंवा समूह प्रवासासाठी रेल्वेकडून विशेष बुकिंग सुविधा उपलब्ध आहे.
  • या सुविधेसाठी आगाऊ नोंदणी, सुरक्षा ठेव आणि काही महत्त्वाचे नियम लागू होतात.
  • बुकिंग रद्द केल्यास वेळेनुसार वेगवेगळे रद्द शुल्क आकारले जाते.
मागेच सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात रेल्वेच्या डब्यात हनिमूनसाठी सजावट केल्याचे दिसून आले. या व्हिडिओनंतर अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की रेल्वेत खरंच असं काही करता येत का? या प्रकरणात परवानगीशिवाय सजावट केल्यामुळे रेल्वे प्रशासनाने जोडप्यावर कारावाई केली. परंतु तुम्हाला जर लग्नाकार्य किंवा खास प्रसंगासाठी रेल्वेचा संपूर्ण कोच बुक करायचा असेल तर ती सुविधा रेल्वेत उपलब्ध आहे. याला फुल टॅरिफ रेट (FTR) सेवा असे म्हटले जाते. या सेवेअंतर्गत तुम्ही रेल्वेचा संपूर्ण कोच बुक करु शकता. चला यासाठी काय प्रोसेस आहे आणि किती पैसे आकारावे लागतील ते सविस्तर जाणून घेऊया.

भारतातील एक सरोवर जिथे पाण्यात तरंगणारे बेट बदलतात आपली जागा, हा आहे जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क

बुकिंगची वेळ आणि कोचची संख्या

FTR रेल्वेत कोच बुक करण्यासाठी प्रवासाच्या किमान ६ महिन्यांआधी आणि कमीतकमी ३० दिवसांआधी रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. एकावेळी व्यक्ती रेल्वेचे दोन कोच बुक करु शकतो. जर तुम्हाला संपूर्ण ट्रेन बुक करायची असेल तर जास्तीत जास्त १८ ते २४ कोच एकावेळी बुक करता येतील. यात दोन एसएलआर कोच आणि जेनरेटर कार समाविष्ट आहेत. हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की, भाड्याने घेतलेले डबे फक्त त्याच स्थानकांवर जोडले किंवा काढले जाऊ शकतात जिथे ट्रेन किमान १० मिनिटे थांबते. त्यामुळे, ही सुविधा सर्व गाड्यांमध्ये उपलब्ध नाही.

किती द्यावा लागेल डिपॉजिट शुल्क?

ऑनलाईन फाॅर्ममध्ये ट्रॅव्हल आणि कोचची संपूर्ण माहिती देण्यासोबतच प्रति कोच रजिस्ट्रेशन सिक्योरिटी डिपॉजिटसाठी ५० हजार रुपये द्यावे लागतील. जर कुणी १८ हून कमी डब्ब्यांवाली रेल्वे बुक करत असेल तरीही त्याला त्याला १८ कोचच्या हिशोबाने ९ लाख रुपये सिक्योरिटी डिपॉजिट फी द्यावी लागेल. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर एक ऑटो-जेनरेटेड रेफरेंस नंबर मिळतो जो पुढील प्रक्रियेसाठी कामाचा ठरतो. या पेमेंटसाठी FTR एप्लीकेशन सुरु केल्यानंतर ६ दिवसांची मुदत देतो. जर पेमेंट केल्यानंतरही नंबर जनरेट झाला नसेल तुम्हाला ७ दिवसांची प्रतिक्षा करावी लागेल. NEFT किंवा RTGS च्या मदतीने हप्यांमध्ये केलेले पेमेंट एक्सेप्ट केले जाणार नाही. जर पेमेंटला अर्धे करुन दोनदा पाठवले जर FTR जनरेट होत नाही आणि तुमचे पैसे तुम्हाला परत दिले जातात. याचबरोबर जर डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या मदतीने किंवा नेटबँकिंगने रियल-टाइममध्ये नंबर जनरेट होत नसेल तर पुढील वर्किंग डे पर्यंत प्रतिक्षा करावी लागेल.

Travel News : पुतना कुंडात आजही भरलेलं आहे विष, हेच ते ठिकाण जिथे श्रीकृष्णाने राक्षिसीनीचा केला होता वध

रिफंड आणि कॅन्सलेशन शुल्काबाबत नियम

प्रवास पूर्ण झाल्यानंतर सिक्योरिटी डिपॉजिटचा रिफंड मिळवण्यासाठी रेल्वेचे नो ड्यूज सर्टिफिकेट आणि ओरिजनल टूर फोल्डरसोबत सर्व आवश्यक कागदपत्रे २१ दिवसांच्या आत IRCTC च्या ऑफिसमध्ये जमा करावे लागतील. जर तुम्ही उशीर केला तर २१ दिवसांनंतर तुमचे डाॅक्यूमेंट एक्सेप्ट केले जाणार नाही. याचबरोबर जर तुम्हाला तुमचे बुकिंग कॅन्सल करायचे असेल तर प्रवासाच्या दोन दिवसाआधी १० टक्क्यांपर्यंतचे शुल्क सिक्योरिटी डिपॉजिटमधून कापून घेतले जाईल. जर तुम्ही प्रवासाच्या एक दिवसाआधी बुकिंग कॅन्सल केले तर सिक्योरिटी डिपॉजिटमधून २५ टक्के पैसे कापून घेतले जातील. याचबरोबर जर प्रवासाच्या ४ तासाआधी किंवा ट्रेन सुटल्यानंतर तुम्ही बुकिंग कॅन्सल केले तर ५० टक्के पैसे सिक्योरिटी डिपाॅजिटमधून कट केले जातील. दुसरीकडे जर बुकिंग IRCTC कडून कॅन्सल केली गेली तर सिक्योरिटी डिपॉजिटमधून एक पैसेही कट केले जात नाहीत.

 

Web Title: How to book an entire indian railways coach for weddings and special events ftr guide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 08:15 AM

Topics:  

  • IRCTC
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

Ferry Boat : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबई-अलिबाग फेरीबोट सेवा १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू
1

Ferry Boat : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबई-अलिबाग फेरीबोट सेवा १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू

नेपाळमधील पूरग्रस्त भागाचे जगाला गूढ आकर्षण! पुराचा धोका असूनही भारतासह परदेशी पर्यटकांची गर्दी इथे का?
2

नेपाळमधील पूरग्रस्त भागाचे जगाला गूढ आकर्षण! पुराचा धोका असूनही भारतासह परदेशी पर्यटकांची गर्दी इथे का?

Ratnagiri: रत्नागिरीच्या पर्यटनाला मिळणार चालना; भाट्ये समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणासाठी आराखडा तयार
3

Ratnagiri: रत्नागिरीच्या पर्यटनाला मिळणार चालना; भाट्ये समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणासाठी आराखडा तयार

गॅस सिलेंडरच नाही, रेल्वेतून या वस्तू नेण्यासही आहे मनाई, तुम्हाला नियम माहिती आहेत का?
4

गॅस सिलेंडरच नाही, रेल्वेतून या वस्तू नेण्यासही आहे मनाई, तुम्हाला नियम माहिती आहेत का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.