उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा विकतसारखा बदाम शेक
कडक उन्हाळ्यात शरीराला थंडाव्याची आवश्यकता असते. कारण या दिवसांमध्ये शरीराला जास्त पाण्याची आवश्यकता असते. उन्हाळ्यात बाहेर जाऊन आल्यानंतर किंवा इतर वेळी सतत घाम येतो. सतत येणाऱ्या घामामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होण्याची शक्यता असते. शरीरातील पाणी कमी झाल्यानंतर डिहायड्रेशन, अंगात उष्णता वाढणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या सर्व समस्या उद्भवू नये म्हणून उन्हाळ्यात भरपूर पाणी, थंड पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला कडक उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी बदाम शेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बदाम शेक लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडते. बदाम आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. त्यामुळे दिवसाची सुरुवात तुम्ही बदाम शेक पिऊनसुद्धा करू शकता. चला तर जाणून घेऊया बदाम शेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
Alu Vadi Recipe: महाराष्ट्रीयन स्टाईल पारंपरिक अळूवडी रेसिपी; जेवणाची चव होईल द्विगुणित