Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe: सोप्या पद्धतीने घरीच बनवा साऊथ स्टाईल सांबार; जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप रेसिपी

South Style Sambhar Recipe: जर तुम्हालाही घरच्याघरी साऊथ स्टाईल सांबार बनवायाचा असेल तर ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 24, 2026 | 08:51 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:

दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये सांबार हा सर्वात लोकप्रिय आणि पौष्टिक पदार्थ मानला जातो. इडली, डोसा, मेदूवडा किंवा गरमागरम भातासोबत सांबार खाण्याची मजाच वेगळी असते. डाळ, भाज्या, चिंचेचा आंबटपणा आणि खास मसाल्यांचा सुगंध यामुळे सांबारची चव अधिक खुलते. योग्य प्रमाणात भाज्या आणि मसाले वापरले तर घरच्या घरीही अगदी हॉटेलसारखा स्वादिष्ट सांबार तयार करता येतो. सांबार बनवण्यासाठी लागणाऱ्या भाज्या, मसाले आणि त्याची सोपी रेसिपी, जाणून घ्या.

घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा साऊथ स्टाईल मेदू वडा, वाचा सोपी रेसिपी

सांबार बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • १ कप तूर डाळ
  • ३ कप पाणी
  • ¼ चमचा हळद
  • चवीनुसार मीठ
  • शेवग्याच्या शेंगा
  • गाजर
  • भोपळा
  • वांगे
  • भेंडी
  • छोटा कांदा
  • १ टोमॅटो
  • चिंच
  • २ चमचे सांबार मसाला
  • चिमूटभर हिंग
  • १ चमचा मोहरी
  • ½ चमचा मेथीदाणे
  • २ सुक्या लाल मिरच्या
  • १०-१२ कढीपत्त्याची पाने
  • २ चमचे तेल किंवा तूप
  • कोथिंबीर
  • चवीसाठी थोडासा गूळ

सांबार बनवण्याची स्टेप-बाय-स्टेप पद्धत

सर्वप्रथम तूर डाळ स्वच्छ धुऊन कुकरमध्ये घ्या. त्यात पाणी, हळद आणि थोडे तेल घालून ३ ते ४ शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. डाळ व्यवस्थित मऊ झाल्यावर चमच्याने किंवा घोट्याने मॅश करून बाजूला ठेवा. यानंतर, एका मोठ्या भांड्यात सर्व चिरलेल्या भाज्या आणि थोडे पाणी घालून शिजवून घ्या. भाज्या जास्त मऊ होणार नाहीत याची काळजी घ्या. चिंच थोडा वेळ पाण्यात भिजवून तिचा कोळ वेगळा करुन घ्या. हा कोळ भाज्यांमध्ये घाला. त्यानंतर सांबार मसाला, हिंग आणि मीठ घालून ५ ते ७ मिनिटांसाठी मिश्रण उकळवा. आता शिजवलेली डाळ या मिश्रणात घाला आणि नीट एकजीव करा. सांबार जास्त घट्ट वाटत असल्यास थोडे गरम पाणी घाला. नंतर ५ ते १० मिनिटे मंद आचेवर उकळू द्या. एका छोट्या पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात मोहरी, मेथीदाणे, लाल मिरच्या आणि कढीपत्ता घाला. मोहरी तडतडली की ही फोडणी तयार झालेल्या सांबारवर घाला. शेवटी वरून ताजी कोथिंबीर घाला. गरमागरम सांबार इडली, डोसा, वडा किंवा भातासोबत सर्व्ह करा.

परफेक्ट सांबारसाठी खास टिप्स

  • सांबार बनवल्यानंतर १५-२० मिनिटे झाकून ठेवल्यास चव अधिक मुरते.
  • भेंडी वापरत असल्यास ती आधी हलकी परतून घातल्यास चिकटपणा कमी होतो.
  • थोडासा गूळ घातल्यास आंबट आणि तिखट चवीचा उत्तम समतोल साधला जातो.
Recipe: उरलेल्या भातापासून बनवा क्रिस्पी मंचुरियन, नोट करा झटपट आणि चविष्ट रेसिपी

Web Title: How to make authentic south indian sambar recipe at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 08:51 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • indian food

संबंधित बातम्या

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी
1

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा
3

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी
4

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.