तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी
श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर सणवार सुद्धा चालू होतात. सणांच्या दिवशी घरात गोड पदार्थ आवर्जून बनवले जातात. गुलाबजाम, बासुंदी, शेवयांची खीर इत्यादी ठराविक पदार्थ कायमच बनवले जातात. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा झाल्यास मिल्क केक बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. लवकरच रक्षाबंधन सण येणार आहे. सणावाराच्या दिवसांमध्ये बाजारातील गोड पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. भेसळ युक्त पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले टेस्टी आणि स्वच्छ ठिकाणी बनवलेले पदार्थ खावेत. दुधापासून बनवलेली मिठाई दोन दिवस व्यवस्थित टिकून राहते. त्यामुळे गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास मिल्क केक बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)






