
तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा खमंग चटपटीत दही मिरची
जेवणाच्या ताटात प्रत्येकाला काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. नेहमीच त्याच ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही झणझणीत खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी कोणताही विकतचा पदार्थ खाण्याऐवजी झटपट तुम्ही खमंग चटपटीत दही मिरची बनवू शकता. दह्याचा आंबटपणा आणि तिखट मिरची चवीला अतिशय भारी लागते. रोजच्या साध्या जेवणाची चव वाढवण्यासाठी दही मिरची हा पदार्थ अतिशय उत्तम आहे. कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळात तयार होणारा पदार्थ डब्यासाठी सुद्धा बनवू शकता. घरातील सगळ्यांचं कायमच चटपटीत चवीचे पदार्थ खायला हवे असतात. पण नेहमीच कामाच्या धावपळीमध्ये पदार्थ बनवण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. अशावेळी तुम्ही दही मिरची बनवू शकता. पारंपरिक चवीची दही मिरची खाल्ल्यानंतर घरातील सगळेच तुमचे कौतुक करतील. दही मिरची तुम्ही गरमागरम भाकरी किंवा वाफाळत्या भातासोबत सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया दही मिरची बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
Rava Cutlet: नाश्त्यासाठी झटपट बनवा रव्याचे कुरकुरीत कटलेट, नोट करा सोपी रेसिपी