
पावसाळ्यातील थंडगार वातावरणात प्या गरमागरम शेवगा-दुधीचे सूप; सर्दी खोकल्यापासून मिळेल आराम, राहाल कायमच फ्रेश
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आरोग्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. कारण सतत पडणाऱ्या पावसात भिजल्यामुळे किंवा दूषित पाण्याच्या सेवनामुळे पोटाचे विकार आणि साथीच्या आजारांची शरीराला लागण होण्याची जास्त शक्यता असते. सर्दी, खोकला, ताप किंवा डेंग्यू, मलेरियासारख्या गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. साथीच्या आजारांची लागण झाल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते आणि थकवा, अशक्तपणा वाढू लागतो. त्यामुळे आजारी पडल्यानंतर आहारात सहज पचन होणाऱ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला थंडगार वातावरणात गरमागरम शेवगा-दुधीचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले गरमागरम शेवगा-दुधीचे सूप शरीरात उष्णता निर्माण करेल आणि आरोग्य सुधारण्यास मदत करेल. महिलांच्या शरीरासाठी शेवग्याच्या शेंगा वरदान ठरतात. यामध्ये असलेले आवश्यक फायबर, कॅल्शियम आणि विटामिन आरोग्य सुधारतात आणि थकवा, अशक्तपणा कमी करतात. सूप प्यायल्यामुळे घशात वाढलेली खवखव आणि वेदना कमी होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया गरमागरम शेवगा-दुधीचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)