
तेलकट पदार्थांना द्या रामराम! उपवासाच्या वरीच्या तांदळाच्या वापर करून बनवा मऊलुसलुशित इडली, नोट करा रेसिपी
उपवासाच्या दिवशी प्रत्येक घरात साबुदाणे किंवा बटाटा बनवला जातो. साबुदाणा खिचडी, वडे किंवा बटाटा भाजी बनवून खाल्ली जाते. पण उपाशी पोटी साबुदाण्याचे सेवन केल्यास ऍसिडिटी वाढून आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे उपवासाच्या साबुदाण्याचे सेवन करण्याऐवजी इतर पदार्थ खावेत.म्हणूनच आज आम्ही तुम्हाला झटपट तयार होणारी उपवासाची इडली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ खोबऱ्याच्या किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत अतिशय सुंदर लागतो. वरीच्या तांदळाचा वापर करून बनवलेला पदार्थ चवीसोबत शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. आषाढी एकादशीला महिलांसह पुरुष सुद्धा उपवास करतात. उपवासाच्या दिवशी विकतचे चिप्स किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले वरीचे तांदूळ किंवा फळांचे सॅलड खावे. यामुळे पोट सुद्धा भरलेले राहते आणि शरीरात ऊर्जा टिकून राहते. चला तर जाणून घेऊया उपवासाची इडली बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीच्या प्रसादासाठी झटपट बनवा साजुक तुपातला शिरा, नोट करून घ्या रेसिपी