
सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हिरव्या फोडणीचे पोहे
सकाळच्या नाश्त्यात अनेकांच्या घरी कांदापोहे अतिशय आवडीने खाल्ले जातात. कांदापोहे किंवा गोड पोहे बनवले जातात. मात्र नेहमीच नाश्त्यात पोहे खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. नेहमीच उपमा, शिरा किंवा इडली डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर नाश्त्यात नेमकं काय बनवावं? हे सुचत नाही. अशावेळी तुम्ही झटपट हिरव्या फोडणीचे पोहे बनवू शकता. हिरव्या फोडणीचे पोहे चवीला अतिशय सुंदर लागतात. त्यामुळे कमीत कमी वेळात कोणता पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही हिरव्या फोडणीचे पोहे बनवू शकता. आपल्यातील अनेक लोक सकाळच्या वेळी नाश्ता करणे टाळतात. पण असे न करता नाश्त्यात हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. सकाळच्या नाश्त्यात पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ खाल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. चला तर जाणून घेऊया हिरव्या फोडणीचे पोहे बनवण्याची सोपी रेसिपी. हा पदार्थ घरातील लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.(फोटो सौजन्य – istock)
सकाळच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा झणझणीत मसाला शिमला मिरची, पावसाळ्यात बनवा खमंग पदार्थ