Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही झटपट गुलकंद मोदक बनवू शकता. हे मोदक दोन ते तीन आठवडे व्यवस्थित टिकून राहतात आणि चव सुद्धा मस्त लागते. जाणून घ्या गुलकंद मोदक बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 07, 2026 | 10:44 AM
लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक

लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक

Follow Us
Follow Us:

Ganeshotsav 2026: राज्यभरात सगळीकडे गणपती बाप्पाचे स्वागत मोठ्या आनंद आणि उत्साहात केले जाते. बाप्पाचे आगमन झाल्यानंतर घरात मोदकांचा नैवैद्य बनवला जातो. उकडीचे मोदक, रव्याचे मोदक, पुरणाचे मोदक इत्यादी वेगवेगळे मोदक बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला लाडक्या बाप्पासाठी गुलकंद मोदक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले मोदक चवीला अतिशय सुंदर लागतात. गुलकंद मोदक आरतीनंतर प्रसादासाठी सुद्धा देऊ शकता. गुलकंद आणि सुका मेव्याचा वापर करून बनवलेला मोदक खाल्ल्यानंतर घरातील सगळेच तुमचं कौतुक करतील. नैवेद्याच्या थाळीमध्ये वेगवेगळे रंगीत मोदक ठेवायचे असल्यास तुम्ही या पद्धतीने चविष्ट गुलकंद मोदक बनवू शकता. हे मोदक दोन ते तीन आठवड्यांपर्यंत व्यवस्थित टिकून राहतात. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Smoothie Recipe: नाश्त्यासाठी किंवा स्नॅक टाइमसाठी परफेक्ट! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चॉकलेट स्मूदी

साहित्य:

  • गुलकंद
  • सुका मेवा
  • वेलची पावडर
  • सुक्या खोबऱ्याचा किस
  • खवा
  • पिठीसाखर
  • दूध
  • साजूक तूप
  • गुलाब सिरप
Breakfast Recipe: साध्या पोह्यांना द्या चायनीज तडका! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट शेजवान पोहे, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • गुलकंद मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम, पॅनमध्ये तूप गरम करून त्यात खवा घालून मंद आचेवर व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात दोन ते तीन चमचे दूध आणि रोझ सिरप घालून व्यवस्थित मिक्स करा. मोदक बनवताना गॅस मंद आचेवर ठेवावा.
  • त्यानंतर तयार केलेल्या मिश्रणात पिठीसाखर किंवा कन्डेन्स्ड मिल्क घालून मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणाचा घट्टसर गोळा तयार झाल्यानंतर गॅस बंद करा.
  • वाटीमध्ये गुलकंद घेऊन त्यात काजू, बदाम, किसलेले खोबरे आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • मोदकाच्या साचल्याला तूप लावून त्यात तयार केलेले मिश्रण मोदकाच्या साच्याला लावून त्यात गुलकंदाचे मिश्रण भरून मोदक व्यवस्थित पॅक करा.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले गुलकंद मोदक.

Web Title: How to make gulkand modak at home ganeshotsav 2026 modak recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 10:44 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Ganeshotsav 2026

संबंधित बातम्या

Smoothie Recipe: नाश्त्यासाठी किंवा स्नॅक टाइमसाठी परफेक्ट! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चॉकलेट स्मूदी
1

Smoothie Recipe: नाश्त्यासाठी किंवा स्नॅक टाइमसाठी परफेक्ट! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चॉकलेट स्मूदी

DJ Ban Controversy : ‘राज ठाकरेंच्या डोक्याचा खोका खाली आहे का?’; DJ बंदीवरून गुणरत्न सदावर्तेंचा घणाघाती हल्ला
2

DJ Ban Controversy : ‘राज ठाकरेंच्या डोक्याचा खोका खाली आहे का?’; DJ बंदीवरून गुणरत्न सदावर्तेंचा घणाघाती हल्ला

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पांना मोदकच का आवडतात? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा
3

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पांना मोदकच का आवडतात? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा

Raj Thackeray on DJ : ‘डीजे-डॉल्बी ही उत्तरेची संस्कृती, महाराष्ट्रात का आणता?’; राज ठाकरेंचा परखड सवाल, फडणवीसांनाही लगावला टोला!
4

Raj Thackeray on DJ : ‘डीजे-डॉल्बी ही उत्तरेची संस्कृती, महाराष्ट्रात का आणता?’; राज ठाकरेंचा परखड सवाल, फडणवीसांनाही लगावला टोला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.