मखाना (Makhana) आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, जेव्हा वजन कमी (weight loss) करण्यासाठी हेल्दी स्नॅकचा (healthy Snacks) विचार केला जातो तेव्हा मखाना खाण्याचा सल्ला दिला जातो. मखाना खीरही तुम्ही बनवली असेल, परंतु तुम्हाला माहित आहे का की, त्यापासून चविष्ट डोसा देखील तयार केला जाऊ शकतो. मखाना डोसा (Makhana Dosa) हा एक झटपट तयार होणारा पदार्थ आहे जो त्वरित भूक भागवू शकतो. तो कसा बनवायचे ते पहा
मखाना – 1 कप
रवा – 1 कप
पोहे – 1/2 कप
दही – 1 कप
मीठ – चवीनुसार
इनो – 1 टीस्पून
पाणी – 1 कप
ते बनवण्यासाठी मखाना, पोहे, रवा आणि दही एकत्र करून घ्या.त्यात मीठ आणि थोडे पाणी घालून किमान ३० मिनिटे भिजवू द्या. आता हे पदार्थ मिक्सरमध्ये टाका आणि पेस्ट करुन घ्या. ब्लेंड करताना तुम्ही मिश्रणात आवश्यकतेनुसार पाणी घालू शकता. नंतर एका भांड्यात पेस्ट काढून त्यात इनो मिक्स करा. एक नॉन-स्टिक पॅन गरम करा आणि डोस्यासारखे पीठ पसरवा, तूप घालून भाजून घ्या. हा चविष्ट डोसा चटणीसोबत सर्व्ह करा.