Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चमचमीत जेवणाचा बेत! घरी बनवा हॉटेल स्टाईल ‘व्हेज मराठा’, एक घास खाताच पदार्थाचे फॅन होऊन जाल

Veg Maratha Recipe : व्हेज मराठा म्हणजे घरगुती भाज्यांना दिलेला रेस्टॉरंट स्टाइल तडका, झणझणीत, खमंग आणि स्वादिष्ट! रात्रीच्या जेवणाला काही खास आणि चविष्ट बनवून खायचं असेल तर हा पदार्थ तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 21, 2025 | 02:31 PM
चमचमीत जेवणाचा बेत! घरी बनवा हॉटेल स्टाईल 'व्हेज मराठा', एक घास खाताच पदार्थाचे फॅन होऊन जाल

चमचमीत जेवणाचा बेत! घरी बनवा हॉटेल स्टाईल 'व्हेज मराठा', एक घास खाताच पदार्थाचे फॅन होऊन जाल

Follow Us
Follow Us:

भारतीय पाककलेत वेगवेगळ्या राज्यांची खासियत असते. जसे पंजाबची सरसों दा साग–मक्के दी रोटी, राजस्थानची दाल बाटी, बंगालची माछेर झोल तसेच महाराष्ट्रातील पिठलं-भाकरी, मिसळ पाव आणि भरली वांगी प्रसिद्ध आहेत. पण आजकाल रेस्टॉरंट स्टाइल डिशेसमध्ये एक खास नाव खूप ऐकायला मिळते ज्याचं नाव आहे व्हेज मराठा.

दिवसाची सुरुवात होईल आणखीनच स्पेशल! १० मिनिटांमध्ये घरी बनवा टपरीवर मिळतो तसा चविष्ट उकाळा

व्हेज मराठा ही डिश महाराष्ट्रीयन झणझणीत मसाल्याची चव आणि रेस्टॉरंट स्टाइल ग्रेव्हीचा संगम आहे. ह्या डिशमध्ये भाज्यांचे छोटे बॉल्स (कोफ्ते) मसालेदार ग्रेव्हीत घालून बनवले जातात. त्यामुळे यात एक वेगळाच खमंग स्वाद येतो. कोफ्त्यांची कुरकुरीत चव, टॉमॅटो–कांद्याची लालसर झणझणीत ग्रेव्ही आणि वरून कोथिंबिरीची सजावट.. सगळं मिळून जेवणाला एकदम खास टच मिळतो. ही डिश प्रामुख्याने पार्टी, खास पाहुणचार किंवा रविवारी कुटुंबासोबतच्या स्पेशल जेवणासाठी अगदी योग्य आहे. हिचा रंग, सुगंध आणि तिखट-खमंगपणा असा आहे की फक्त वासानेच भूक वाढते. कोणत्या खास प्रसंगी किंवा सणावाराला तुम्ही ही रेसिपी ट्राय का रु शकता. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

कोफ्त्यासाठी:

  • उकडलेले बटाटे – २
  • उकडलेले गाजर, बीन्स, मटार (बारीक चिरून) – १ कप
  • कॉर्नफ्लोअर – २ टेबलस्पून
  • आलं–लसूण पेस्ट – १ टीस्पून
  • हिरवी मिरची पेस्ट – १ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • गरम मसाला – ½ टीस्पून
  • कोथिंबीर – २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
  • तेल – कोफ्ते तळण्यासाठी
ग्रेव्हीसाठी:
  • कांदा – २ (बारीक चिरलेला)
  • टॉमॅटो – ३ (प्युरी करून)
  • काजू – ८ ते १० (भिजवून पेस्ट केलेले)
  • आलं–लसूण पेस्ट – १ टेबलस्पून
  • लाल तिखट – २ टीस्पून
  • धणे–जिरे पावडर – २ टीस्पून
  • हळद – ½ टीस्पून
  • गरम मसाला – १ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • साखर – १ टीस्पून (ऐच्छिक)
  • तेल – ३ टेबलस्पून
  • तूप – १ टीस्पून
  • कोथिंबीर – सजावटीसाठी
तिखट चटकदार खमंग चवीचा गावरान स्टाईल भडांग घरी कसा तयार करायचा? रेसिपी जाणून घ्या

कृती

  • सर्वप्रथम एका वाडग्यात उकडलेले बटाटे, उकडलेल्या भाज्या, हिरवी मिरची पेस्ट, आलं-लसूण पेस्ट,
  • कोथिंबीर, गरम मसाला, मीठ व कॉर्नफ्लोअर घालून छान मळून घ्या.
  • या मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे करून तयार ठेवा.
  • गरम तेलात हे गोळे सोनेरी रंग येईपर्यंत डीप फ्राय करा आणि एका प्लेटमध्ये काढून घ्या.
  • एका पॅनमध्ये तेल व तूप गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा टाका. सोनेरी होईपर्यंत परता.
  • आता त्यात आलं-लसूण पेस्ट, हळद, तिखट, धणे-जिरे पावडर टाकून छान परता.
  • मसाल्यात टॉमॅटो प्युरी घालून तेल सुटेपर्यंत परता.
  • आता भिजवलेली काजू पेस्ट टाकून ग्रेव्हीला छान टेक्स्चर द्या.
  • मिश्रणात मीठ, गरम मसाला व थोडी साखर टाकून शिजवा.
  • आपल्या आवडीनुसार पाणी घालून ग्रेव्ही उकळून घ्या.
  • तयार ग्रेव्हीत तळलेले कोफ्ते हलकेच सोडा आणि गॅस बंद करा. वरून कोथिंबीर घालून सजवा.
  • गरमागरम तंदुरी रोटी, नान, पराठा किंवा साधा भात यासोबत व्हेज मराठा अप्रतिम लागतो.
  • वरून थोडं क्रीम किंवा बटर घातलं तर रेस्टॉरंटसारखी रिच चव येते.
  • पार्टीसाठी ही डिश अगदी परफेक्ट आहे कारण रंग, सुगंध आणि टेस्ट सगळं पाहुण्यांना भावणारं असतं.

Web Title: How to make hotel style veg maratha at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 02:30 PM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी
1

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी

Navratri 2026 : नवरात्रीच्या व्रतात काही चटपटीत खायचंय? मग अशाप्रकारे बनवा ‘उपवासाचा बटाटा बडा’
2

Navratri 2026 : नवरात्रीच्या व्रतात काही चटपटीत खायचंय? मग अशाप्रकारे बनवा ‘उपवासाचा बटाटा बडा’

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा
3

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा

Navratri 2026 : नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेला अर्पिण करा मखाना-नारळाची चवदार बर्फी, रेसिपी नोट करा
4

Navratri 2026 : नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेला अर्पिण करा मखाना-नारळाची चवदार बर्फी, रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.