संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चमचमीत फणसाच्या आठळ्या फ्राय
कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले फळ म्हणजे फणस. मे महिन्यात बाजारात मोठ्या फणस उपलब्ध असतात. फणसाच्या गाऱ्यातील आठळ्या अतिशय आवडीने खाल्या जातात. फणसाचे रसाळ आणि कापे गरे सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. या गऱ्यांपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जाते. मात्र अनेक लोक फणसाच्या आठळ्या फेकून देतात. पण फणसाच्या आठळ्या फेकून न देता त्यापासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये संध्याकाळच्या वेळी भूक लागते. कामावरून घरी आल्यानंतर किंवा इतर वेळी थकून घरी आल्यानंतर काहींना काही खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही चमचमीत फणसाच्या आठळ्यांपासून चमचमीत आठळ्या फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी वेळात तुम्ही झटपट आठळ्या फ्राय बनवू शकता.(फोटो सौजन्य – pinterest)
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी काजू शेक, दिवसभर टिकून राहील शरीरात ऊर्जा
पारंपरिक पद्धतीने घरीच बनवा चवदार रसाळ शहाळ्याची भाजी, चवीला लागेल सुंदर पदार्थ