सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी काजू शेक
सकाळी झोपेतून उठल्यानंतर संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जावा, यासाठी अनेक लोक व्यायाम, प्राणायाम आणि इतर अनेक गोष्टी करतात. मात्र वजन वाढेल या भीतीने नाश्ता करणे टाळले जाते. असे न करता सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता केल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो. याशिवाय दुपारच्या वेळी लवकर भूक लागत नाही. नाश्ता करणे आरोग्यासाठी अतिशय फायद्याचे आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काजू शेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. काजू हा पदार्थ उष्ण असल्यामुळे अनेक लोक काजू खात नाहीत. पण रोज ४ किंवा ५ काजू तुम्ही आहारात खाऊ शकता. यामुळे शरीराला ऊर्जा मिळेल आणि संपूर्ण दिवस आनंद, उत्साहात जाईल. चला तर जाणून घेऊया काजू शेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
जेवणात तोंडी लावण्यासाठी तिखट पदार्थ हवा असेल तर लाल मिरच्यांपासून झटपट बनवा झणझणीत वऱ्हाडी ठेचा
सकाळचा नाश्ता होईल स्पेशल! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चीज कॉर्न मॅगी, नोट करून घ्या रेसिपी