
मकरसंक्रांतीला घरी बनवा सोप्या पद्धतीमध्ये गुळपोळी
मकरसंक्रांतीच्या दिवशी तीळ गुळापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात.संपूर्ण राज्यभरात वेगवेगळ्या पद्धतीने मकरसंक्रांती हा सण साजरा केला जातो. या दिवशी अनेक घरांमध्ये हळदीकुंक ठेवून वाण आणि तिळगुळाचे लाडू दिले जातात. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात वेगवेग्ळ्या पद्धतीने मकरसंक्रांत साजरी केली जाते. तसेच यादिवशी अनेक घरांमध्ये पुरणपोळी प्रमाणे गुळाची पोळी बनवली जाते. आरोग्याच्या दृष्टीने गूळ अतिशय पौष्टिक आहे. थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी गुळाचे सेवन केले जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये गूळ पोळी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. अनेकदा गुळपोळी बनवताना त्यातील सारण बाहेर निघते आणि पोळी खराब होते. म्हणून आज आम्ही तुम्हाला गुळपोळी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा