Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रविवार होईल स्पेशल! गरमागरम भातासोबत खाण्यासाठी केरळ स्टाईलने बनवा मॅंगो फिश करी, नोट करून घ्या रेसिपी

दुपारच्या जेवणात गरमागरम भातासोबत केरळ स्टाईल मँगो फिश करी अतिशय चविष्ट लागेल. जेवणाच्या ताटात जर मासे असले तर चार घास जास्त जातात आणि पोट सुद्धा भरते. जाणून घ्या मँगो फिश करी बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 07, 2026 | 08:00 AM
रविवार होईल स्पेशल! गरमागरम भातासोबत खाण्यासाठी केरळ स्टाईलने बनवा मॅंगो फिश करी, नोट करून घ्या रेसिपी

रविवार होईल स्पेशल! गरमागरम भातासोबत खाण्यासाठी केरळ स्टाईलने बनवा मॅंगो फिश करी, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

आंबट तिखट चवीचे पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. जेवणाच्या ताटात जर मासे असतील तर चार घास सगळ्यांचं जास्त जातात. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी बऱ्याच घरांमध्ये नॉनव्हेज बेत केला जातो. त्यातील मासे म्हणजे सगळ्यांच्या अतिशय आवडीचा पदार्थ. माशांपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. फिश फ्राय, फिश मसाला, माशांची आमटी, तिखलं इत्यादी अनेक पद्धतीने मासे बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला केरळा स्टाईलने मँगो फिश करी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ नारळाचे दूध आणि आंबट कैरीचा वापर करून बनवले जाते. गरमागरम भातासोबत माशांची करी अतिशय सुंदर लागते. दुपारच्या जेवणात गरमागरम भातासोबतच तुम्ही केरळ स्टाईल फिश करी खाऊ शकता. घरातील प्रत्येकाला या पद्धतीने बनवलेली केरळ स्टाईल फिश करी खायला खूप जास्त आवडेल. फिश करी बनवताना प्रामुख्याने बांगडा, सुरमई किंवा पापलेट माशांचा वापर करावा. हे माशे चवीला अतिशय टेस्टी लागतात. चला तर जाणून घेऊया केरळ स्टाईल मँगो फिश करी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe: मैद्याऐवजी गव्हाच्या पिठापासून तयार करा चटपटीत समोसे; नोट करा सोपी रेसिपी

साहित्य:

  • सुरमई किंवा इतर कोणताही मासा
  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • कैरी
  • मीठ
  • कांदा
  • आलं लसूण पेस्ट
  • हिरव्या मिरच्या
  • कढीपत्ता
  • हळद
  • लाल तिखट
  • धणे पावडर
  • मेथी दाणे
  • मोहरी
  • खोबऱ्याचं तेल
Recipe : पाैष्टिक आणि टेस्टी, जेवणानंतर काही गोड होऊन जाऊद्यात… दुधीभोपळ्यापासून घरी बनवा ‘कलाकंद’

कृती:

  • मँगो फिश करी बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात ओल्या खोबऱ्याचा किस घालून त्यात पाणी आणि हळद घालून बारीक वाटून घ्या.
  • वाटून घेतलेले मिश्रण कॉटनच्या कपड्यावर ओतून त्यातील खोबऱ्याचा रस काढून घ्या. खोबऱ्याचा रस टाकल्यामुळे करी घट्टसर दिसते.
  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी आणि मेथी दाणे टाकून भाजा. त्यानंतर त्यात कांदे, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट आणि कढीपत्ता घालून लालसर होईपर्यंत भाजा.
  • भाजून सर्व साहित्य मऊ झाल्यानंतर त्यात हळद, लाल तिखट, धणे पावडर घालून मिक्स करा. एक वाफ काढून घ्या.
  • त्यानंतर त्यात मध्यम आकारात कापून घेतलेली कैरी आणि स्वच्छ केलेले माशांचे तुकडे घालून मिक्स करा.
  • त्यानंतर माशांच्या मिश्रणात तयार केलेले ओल्या खोबऱ्याचे दूध घालून हलक्या हाताने मिक्स करा आणि आवश्यकता वाटल्यास पाणी घालावे.
  • ५ ते ६ मिनिटं करीला एक उकळी काढून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली मँगो फिश करी.

Web Title: How to make mango fish curry at home simple food recipe fish curry recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
1

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
2

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
3

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी
4

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.