नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर कॉर्न सॅलेड
सकाळी उठल्यानंतर नाश्त्यासाठी नेमकं काय बनवावं हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. अशावेळी पोहे, उपमा, शिरा किंवा मग इडली, डोसा बनवला जातो. पण तेच तेच पदार्थ सतत खाण्याचा कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. शरीरामध्ये दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आहारात पौष्टीक पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. असे पदार्थ जे खाल्ल्यानंतर आरोग्यसुद्धा फायदे होतील आणि पोटही भरेल. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी पनीर कॉर्न सॅलेड कसे बनवायचे, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पनीर आणि कॉर्न हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
पनीर खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक असलेले सर्व विटामिन भेटतात. पनीरचे सेवन केल्यामुळे शरीरात ऊर्जा कायम टिकून राहते आणि लवकर भूक लागत नाही. शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर आहारात पनीरचा समावेश करण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. त्यामुळे रोजच्या आहारात पनीर आणि कॉर्नचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया पनीर कॉर्न सॅलेड बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: खांडवी बनवण्याची सोपी पद्धत; नाश्त्याला बनवा आणखीन मजेदार






