भाजणी बनवण्याचे टेन्शन कायमचे जा विसरून! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा वाटीभर पोह्यांचे खमंग थालीपीठ
सकाळच्या नाश्त्यात सगळ्यांचं काहींना काही स्पेशल हवे असते. नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा पराठा खाल्ला जातो. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही खाण्याची इच्छा होते. थालीपीठ खाण्याची इच्छा झाल्यानंतर बाजारातून विकतची थालीपीठ भाजणी आणून त्यापासून पदार्थ बनवला जातो. पण नेहमीच विकतची भाजणी आणून थालीपीठ बनवण्यापेक्षा वाटीभर पोह्यांचा वापर करून तुम्ही थालीपीठ बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. नाश्त्यात नेहमीच कांदापोहे बनवून खाण्यापेक्षा पोह्यांपासून बनवलेले कुरकुरीत थालीपीठ खावे. कमीत कमी साहित्य आणि वेळात बनवलेला पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. पोह्यांचे खमंग थालीपीठ तुम्ही दही किंवा हिरव्या मिरचीच्या लोणच्यासोबत खाऊ शकता. यामुळे तुमचे पोट सुद्धा दीर्घकाळ भरलेले राहील आणि शरीराला सुद्धा फायदे होतील. चला तर जाणून घेऊया पोह्यांचे थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)






