होळी सणानिमित्त घरी बनवा 'लुसलुशीत मऊ पुरणपोळी'
संपूर्ण देशभरात होळी सण मोठ्या जलौषात साजरा केला जातो. यादिवशी सर्वच घरांमध्ये पुरणपोळी बनवली जाते. शिवाय लहान मुलांसह अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने रंगपंचमी खेळतात. एकमेकांना रंग लावत आनंदात होळी सण साजरा केला जातो. होळीच्या दिवशी सगळ्यांचं सुट्टी असते. मात्र हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक महिला पुरणपोळी बनवणे टाळतात. बाजारात विकत मिळणारी पुरणपोळी आणून खाल्ली जाते. कारण पुरणपोळी बनवण्यासाठी जास्त वेळ लागतो. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने पुरणपोळी बनवल्यास चवही अतिशय सुंदर लागेल. तुपाची धार टाकून घरी बनवलेली पुरणपोळी लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं नक्की आवडेल. चला तर जाणून घेऊया पुरणपोळी बनवण्याची पारंपरिक रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)