उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लहान मुलांसाठी साखरेचा वापर न करता बनवा ज्वारीचे मफिन्स
उन्हाळा सुरु झाल्यानंतर शाळेतील लहान मुलांना सुट्ट्या लागतात. सुट्ट्या चालू झाल्यानंतर अनेकदा मुलं घरी असल्यानंतर बाहेरील पदार्थ खाण्याचा हट्ट करतात. केक, तेलकट किंवा चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. मात्र नेहमी नेहमी बाहेरील पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. अशावेळी तुम्ही मुलांना साखरेचा वापर न करता ज्वारीच्या पिठाचे मफिन्स बनवून खाण्यास देऊ शकता. लहान मुलांसह अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मफिन्स खायला खूप आवडतात. बाजारात मिळणाऱ्या मफिन्समध्ये साखर आणि मैद्याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. अतिसाखरेचे पदार्थ खाणे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहेत. त्यामुळे दैनंदिन आहारात कमीत कमी साखरयुक्त पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये ज्वारीचे मफिन्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)