
साखर, मैद्याचा वापर न करता वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा पौष्टिक वड्या, थकवा- अशक्तपणा होईल गायब
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर घामावाटे शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षार बाहेर पडून जातात. ज्याच्या परिणामामुळे शरीरात थकवा, अशक्तपणा वाढू लागतो. तसेच शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. आहारात ज्यूस, कोल्ड्रिंक इत्यादी पेयांसोबतच पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. बऱ्याचदा गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर चॉकलेट किंवा विकतची मिठाई आणून खाल्ली जाते. पण नेहमीच साखर आणि मैदा असलेल्या पदार्थांचे सेवन करण्याऐवजी नाचणीपासून घरीच बनवलेल्या पौष्टिक वड्यांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये साखर मैद्याचा वापर न करता नाचणीच्या पौष्टिक वड्या बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. उन्हाळ्यासाठी नाचणीच्या वड्या अतिशय गुणकारी ठरते. नाचणीच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारते. उष्णता वाढल्यानंतर थकवा, अशक्तपणा जाणवू लागल्यास नाचणीपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. नाचणीमध्ये कॅल्शिअम आणि लोह मुबलक प्रमाणात आढळून येते, ज्यामुळे शरीरात वाढलेला अशक्तपणा कमी होतो. जाणून घ्या नाचणीच्या वड्या बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)