Maharashtra breaking News Marathi (Credit- AI)
21 Feb 2026 11:22 AM (IST)
इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातून आलेल्या नेत्यांशी आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांशी महत्त्वपूर्ण चर्चा केली. हैदराबाद हाऊस येथील बैठकीत पंतप्रधानांनी अँटोनियो गुटेरेस (संयुक्त राष्ट्र), अनुराकुमार दिसानायके (श्रीलंका), नवीनचंद्र रामगुलाम (मॉरिशस), स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी आणि लीख्टेनस्टाईनचे राजकुमार अलोइस यांच्यासोबत द्विपक्षीय संबंध, भूराजकीय मुद्दे आणि भविष्यातील आव्हानांवर चर्चा केली. यावेळी द्विपक्षीय सहकार्य वाढवणे, उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात भागीदारी मजबूत करणे आणि जागतिक स्तरावर समन्वय वाढवण्यावर भर देण्यात आला. याशिवाय पंतप्रधानांनी १६ एआय आणि डीपटेक स्टार्टअप्सच्या सीईओंशी संवाद साधत विविध क्षेत्रातील नवकल्पनांवर भर दिला.
21 Feb 2026 11:12 AM (IST)
बांगलादेशचे वरिष्ठ सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद सलाहुद्दीन यांनी माजी क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांच्यावर जोरदार टीका केली आहे, ज्यांनी असा दावा केला होता की बांगलादेश टी-२० विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर दोन क्रिकेटपटू मानसिक कोमात गेले. सुरक्षेच्या कारणास्तव नजरुलने बांगलादेश संघ भारतात न पाठवण्याचा निर्णय घेतला. परिणामी, बांगलादेशला २०२६ च्या टी२० विश्वचषकातून वगळण्यात आले. त्यांच्या जागी स्कॉटलंडला गट क मध्ये ठेवण्यात आले.
21 Feb 2026 11:02 AM (IST)
बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावकारीच्या त्रासामुळे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेहसह पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत संबंधित सावकारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ही घटना धारूर तालुक्यातील गावंदरा येथे घडली.
21 Feb 2026 10:52 AM (IST)
भारताच्या सराव सत्रातील फोटो समोर येत आहेत, जे पुढील सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संभाव्य बदल सूचित करतात. संजू सॅमसनचे पुनरागमन होण्याची शक्यता खूप जास्त दिसते. टीम इंडियाने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुपर ८ साठी सराव केला. दरम्यान, संजू सॅमसनने खूप मेहनत घेतली. त्याने विविध प्रकारच्या गोलंदाजी हल्ल्यांचा सामना केला. गेल्या काही सत्रांमध्ये संजूने तितका सराव केला नव्हता, परंतु यावेळी तो पूर्णपणे लक्ष केंद्रित करत असल्याचे दिसून आले.
21 Feb 2026 10:45 AM (IST)
पश्चिम आफ्रिका देश नायजेरिया (Nigeria) सध्या दुहेरी संकटाचा सामना करत आहे. एकीकडे अतिरेकी हल्ला तर दुसरीकडे खाणीच विषारी वायूची गळती झाली आहे. ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. अतिरेकी हल्ल्यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे, तर गॅस गळतीमुळे देखील अनेकांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनांमध्ये ७१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
21 Feb 2026 10:37 AM (IST)
राजधानी दिल्लीत आयोजित भारत एआय इम्पॅक्ट परिषदेत अनेक नाविन्यपूर्ण बाबींचे दर्शन घडले, एकीकडे गलगोटिया युनिव्हर्सिटीकडून चिनी रोबोट सादर केल्याने गालबोट लागले असले तरी अनेक नाविन्यपूर्ण आणि चांगल्या बाबीही एआय परिषदेत बघायला मिळाल्या, त्याचे मोठे कौतुकही होत आहे. यापैकी एक एआय-चालित हवाई टॅक्सीचे मॉडेल आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे, भविष्यात भारतात हवाई टॅक्सी सेवा उपलब्ध होऊ शकेल, एवढी क्षमता त्यात आहे.
21 Feb 2026 10:29 AM (IST)
केशव महाराज (कर्णधार), ओटिनेल बार्टमन, इथन बॉश, गेराल्ड कोएत्झी, टोनी डी जिओर्गी, कॉनर एस्टरह्युझेन, डायन फॉरेस्टर, जॉर्डन हरमन, रुबिन हरमन, जॉर्ज लिंडे, नकोबानी मोकोएना, एंडिले सिमेलेन, लुथो सिपामला, प्रिनेलन सुब्रेन आणि एस जेसन.
21 Feb 2026 10:20 AM (IST)
राज्यातील मद्यविक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत जोरदार वाढ झाली आहे. १ एप्रिल २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत राज्यभर मद्यविक्री २२४९२ कोटी रुपये झाली. ही रक्कम मागील वर्षीच्या १९२५६ कोटींपेक्षा १६.८ टक्के जास्त आहे. यात ठाणे, सोलापूर, धुळे आणि नंदुरबारसारख्या जिल्ह्यांत विक्रीत विशेष वाढ झाली, तर मुंबई उपनगर आणि नागपूर विभागात तुलनेने विक्री कमी राहिली.
21 Feb 2026 10:11 AM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाने जागतक व्यापाराला हादरवून टाकले आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांचे टॅरिफ बेकायदेशीर ठरवल्याच्या अवघ्या काही तासानंतर एका मोठ्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर १०% जागतिक टॅरिफ लादले आहे. त्यांनी न्यायालयाचा निर्णय धुडकावून संपूर्ण जगाला धक्का दिला आहे.
21 Feb 2026 10:03 AM (IST)
डिजिटल जगात डीपफेक आणि दिशाभूल करणाऱ्या एआय-जनरेटेड कंटेंटचा प्रसार रोखण्यासाठी भारत शासनाने २० फेब्रुवारीपासून नवीन आयटी नियम लागू केले आहेत. इंटरनेटवर डीपफेक आणि एआय-जनरेटेड कंटेंटचा वेगाने होणाऱ्या वाढीच्या पार्श्वभूमीवर, सरकारने कठोर भूमिका स्वीकारली आहे. नवीन नियमांनुसार, कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणताही बेकायदेशीर, दिशाभूल करणारा किंवा अश्लील डीपफेक कंटेंट आढळल्यास, संबंधित कंपनीला अधिकाअधिक ३ तासांच्या आत तो काढून टाकावा लागेल. या नियमांचे पालन न करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
21 Feb 2026 09:45 AM (IST)
Abhishek Sharma-Gautam Gambhir : भारताच्या संघाने सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे, आता विश्वचषकाची सुपर 8 ची लढत आणखी मनोरंजक होणार आहे. त्याचबरोबर सर्व मजबूत लढत संघामध्ये पाहायला मिळणार आहे. भारतीय संघासाठी या विश्वचषकामध्ये चिंतेची बाब म्हणजेच भारतीय संघाचा स्टार सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा खराब फार्ममध्ये आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकात अभिषेक शर्मा आतापर्यंत पूर्णपणे अपयशी ठरला आहे. त्याने ग्रुप स्टेजमध्ये एकही धाव घेतली नाही आणि त्याच्या तिन्ही सामन्यात तो शून्यावर बाद झाला. सर्वांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु त्याची बॅट आतापर्यंत शांत राहिली आहे.
21 Feb 2026 09:40 AM (IST)
Donald Trump Signs Global Tariff Executive : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाने जागतक व्यापाराला हादरवून टाकले आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांचे टॅरिफ बेकायदेशीर ठरवल्याच्या अवघ्या काही तासानंतर एका मोठ्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर १०% जागतिक टॅरिफ लादले आहे. त्यांनी न्यायालयाचा निर्णय धुडकावून संपूर्ण जगाला धक्का दिला आहे.
21 Feb 2026 09:35 AM (IST)
छत्रपती संभाजीनगर: शहरातील तिसगाव चौफुली परिसरात पोलिसांनी एका संशयास्पद रिक्षाची तपासणी केली असता, त्यात एका २० वर्षीय तरुणीचा मृतदेह गादीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळला. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून वाळूज पोलिसांनी याप्रकरणी तरुणीच्या आई-वडिलांना ताब्यात घेतले आहे.
काल एक रिक्षा घरातील सामानासह गावाकडे जात असताना तिसगाव चौफुली येथे पोलिसांनी अडवली. रिक्षातील लोकांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तपासणी सुरू केली. तेव्हा घरगुती साहित्यासोबतच एका गादीत काहीतरी गुंडाळल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. गादी उघडली असता त्यात एका तरुणीचा मृतदेह आढळल्याने पोलीसही चक्रावून गेले.
21 Feb 2026 09:30 AM (IST)
मेरठ (उत्तर प्रदेश): राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शुक्रवारी मेरठ येथे खेळाडूंना संबोधित करताना संघाच्या ध्येयधोरणांबाबत महत्त्वाचे भाष्य केले. "संघाचा उद्देश राजकीय सत्ता मिळवणे नसून, हिंदू समाजाचे संघटन आणि चारित्र्यवान व्यक्तींच्या माध्यमातून देशाला समर्थ करणे हा आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
कुठे झाला कार्यक्रम: मेरठमधील शताब्दी नगरातील 'माधव कुंज' येथे हा कार्यक्रम पार पडला.
सहभागी: देश-विदेशातील जवळपास ९५० खेळाडूंनी या संवाद सत्रात सहभाग घेतला होता.
संघाची भूमिका: संघ कोणत्याही सत्तास्पर्धेत नाही किंवा कोणाच्या विरोधाच्या भावनेने प्रेरित नाही.
मूळ उद्देश: संपूर्ण हिंदू समाजाला संघटित करणे आणि व्यक्ती निर्माण कार्याद्वारे राष्ट्राला मजबूत करणे, हाच संघाचा पाया आहे.
21 Feb 2026 09:25 AM (IST)
मुंबई: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक अत्यंत सकारात्मक बातमी समोर आली आहे. देशाच्या परकीय चलन साठ्याने आतापर्यंतचा सर्वकालीन उच्चांक (All-time High) गाठला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, भारताच्या तिजोरीत मोठी वाढ झाली आहे.
एकूण परकीय चलन साठा: ७२५.७२७ अब्ज डॉलर्स.
आठवड्याभरातील वाढ: ८.६६ अब्ज डॉलर्स (१३ फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात).
परकीय चलन मालमत्ता (FCA): ३.५५ अब्ज डॉलर्सने वाढून ५७३.६०३ अब्ज डॉलर्सवर.
21 Feb 2026 09:20 AM (IST)
मुंबई: भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर आणि टी-२० रँकिंगमध्ये अव्वल स्थानी असलेला अभिषेक शर्मा सध्या आपल्या खराब फॉर्ममुळे चर्चेत आहे. ग्रुप स्टेजमधील तीन सामन्यांत सलग तीन वेळा शून्यावर बाद झाल्याने, त्याला 'सुपर-८' फेरीतून वगळले जाणार अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्केल यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
२२ फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना मोर्केल यांनी अभिषेकची पाठराखण केली:
संघाबाहेर नाही: "अभिषेक शर्माला संघातून वगळण्याबाबत संघ व्यवस्थापनात कोणतीही चर्चा झालेली नाही."
नेट प्रॅक्टिसमध्ये लय: "तो नेट्समध्ये चेंडूवर चांगले प्रहार करत आहे. त्याच्या फलंदाजीची लय पाहून आम्हाला खात्री आहे की तो लवकरच मोठी धावसंख्या उभारेल."
21 Feb 2026 09:15 AM (IST)
बीड (परळी): बीड जिल्ह्यातील परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. लाचेची मागणी केल्याप्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या अटकेनंतर काही संतप्त नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, एका तक्रारदाराला 'सॉल्वन्सी प्रमाणपत्र' हवे होते. हे प्रमाणपत्र देण्यासाठी तहसीलदार मुंडे यांनी सुरुवातीला ५० हजार रुपयांची मागणी केली होती. एसीबीच्या पडताळणी दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली:
21 Feb 2026 09:10 AM (IST)
सोलापूर: राज्यात आजपासून दहावीच्या (SSC) बोर्ड परीक्षांना सुरुवात झाली आहे. प्रशासनाकडून 'कॉपीमुक्त अभियान' राबवले जात असतानाच, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे मराठीच्या पेपरला चक्क १० तोतया विद्यार्थी दुसऱ्याच्या जागी परीक्षा देताना आढळले आहेत.
कुठे घडला प्रकार: मंगळवेढा तालुक्यातील परीक्षा केंद्रे.
कोणी केली कारवाई: परीक्षा केंद्रावरील भरारी पथक आणि केंद्रप्रमुख.
शिक्षा: केंद्रप्रमुखांनी दिलेल्या तक्रारीनंतर, पोलिसांनी या सर्व १० तोतया विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करत कायदेशीर कारवाई केली आहे.
21 Feb 2026 09:05 AM (IST)
फ्री फायर मॅक्समध्ये सतत नवीन नवीन इव्हेंट सुरू असतात. या इव्हेंटमध्ये प्लेयर्सना विविध रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळते. विशेषतः गेममध्ये सुरू होणारे लक रॉयल इव्हेंट प्लेअर्ससाठी खूप फायदेशीर ठरतात. गेममध्ये सुरू होणाऱ्या लक रॉयल इव्हेंटमध्ये प्लेयर्सना अल्ट्रा-एक्सक्लूसिव गेमिंग आइटम जसे गन स्किन, बंडल आणि इमोट क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. हे रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेयर्सना अत्यंत कमी डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. या गेमिंग आयटम्सच्या मदतीने प्लेअर्सचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक चांगला होतो. सध्या गेममध्ये विविध लक रॉयल इव्हेंट सुरू आहेत. या इव्हेंटमध्ये सहभागी होऊन प्लेयर्सना प्रीमियम रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळते. चला तर मग गेममध्ये सुरु असलेल्या लक रॉयल इव्हेंटबाबत जाणून घेऊया. वाचा सविस्तर-
21 Feb 2026 08:59 AM (IST)
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईनेच आपल्या २० वर्षीय मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगाव चौफुली येथे घडली. एका रिक्षात तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेने खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. मात्र जन्मदात्या आईनेच आपल्या मुलीची हत्या का केली? नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घ्या. वाचा सविस्तर-
कोकणातील चाकरमान्यांसाठी शिमग्याच्या (होळी) मुहूर्तावर राज्य सरकारने एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. १ मार्चपासून मुंबई ते तळकोकण असा समुद्री प्रवास सुरू होत असून, यामुळे प्रवाशांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार आहेत.






