Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : रेस्टॉरंटसारखी चमचमीत ग्रेव्ही आता घरीच बनवा, व्हेज-नॉनव्हेज कोणत्याही भाजीत करता येईल वापर

Restaurant Style Gravy Recipe : रेस्टॉरंटच्या जेवणाची खास चव ही तिच्या ग्रेव्हीत दडलीये असते. ही एक ग्रेव्ही प्रत्येक भाजीसोबत वापरली जाऊ शकते. चला ही ग्रेव्ही घरी कशी बनवायची ते जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 26, 2025 | 09:57 AM
Recipe : रेस्टॉरंटसारखी चमचमीत ग्रेव्ही आता घरीच बनवा, व्हेज-नॉनव्हेज कोणत्याही भाजीत करता येईल वापर

Recipe : रेस्टॉरंटसारखी चमचमीत ग्रेव्ही आता घरीच बनवा, व्हेज-नॉनव्हेज कोणत्याही भाजीत करता येईल वापर

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय पाककलेत ‘ग्रेव्ही’ हा शब्द ऐकताच आपल्यासमोर जेवणातले ते सुगंधी, समृद्ध आणि रेस्टॉरंटमधील डिशेसमधील खास चव घेऊन येणारे सॉस-सदृश मिश्रण डोळ्यांसमोर उभे राहते. घरगुती जेवणाचे रूप एकदम बदलून टाकण्याची ताकद या ग्रेव्हीमध्ये असते. पण घरच्या घरी अगदी रेस्टॉरंटसारखी ग्रेव्ही तयार करणे हे अनेकांच्या दृष्टीने वेळखाऊ आणि कष्टाचे काम वाटते. म्हणूनच ‘रेडीमेड ग्रेव्ही’ हा पर्याय आजकाल खूप लोकप्रिय झाला आहे.

कुरकुरीत नाश्ता चहाची मजा वाढवेल, यंदा घरी बटाट्याचे नाही तर लालचुटुक बीटरूट चिप्स बनवून पहा; रेसिपी नोट करा

रेस्टॉरंटमध्ये कोणतीही डिश पटकन सर्व्ह करण्यासाठी अशा बेस ग्रेव्हीज मोठ्या प्रमाणावर तयार करून वापरतात. एकच बेस ग्रेव्ही तयार असली की त्यावरून असंख्य डिशेस काही मिनिटांत तयार करता येतात. जसे की पनीर बटर मसाला, व्हेज कोल्हापुरी, आलू मटर, पनीर हांडी, काजू करी, दुम आलू आणि आणखी कितीतरी…

आपणही घरच्या घरी हाच ‘रेस्टॉरंट ट्रिक’ वापरू शकतो. एकदा ही बेस ग्रेव्ही तयार करून घेतली की आठवडाभर सहज फ्रिजमध्ये टिकते आणि पाहुणे आले, बनवायची वेळ कमी असली किंवा अचानक काहीतरी खास खायची इच्छा झाली तर ही ग्रेव्ही अगदी देवदूतासारखी मदत करते! खास गोष्ट म्हणजे ही ग्रेव्ही कोणत्याही भाजीसोबत वापरली तर तिची चव त्यानुसार बदलते. टोमॅटो, कांदा आणि मसाल्यांचे संतुलित प्रमाण, तसेच हॉटेलसारखी कन्सिस्टन्सी आणि चमचमीत लाल रंग हे सगळं मिळवण्यासाठी ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे.

साहित्य:

  • ४ मोठे कांदे (जाड काप)
  • ६-७ पिकलेले लाल टोमॅटो
  • ८-१० लसणाच्या पाकळ्या
  • १ इंच आल्याचा तुकडा
  • ८-१० काजू
  • २ टेबलस्पून तेल
  • १ टेबलस्पून बटर
  • २ तेजपत्ते
  • २-३ लवंगा
  • १ इंच दालचिनी
  • २ हिरवे वेलदोडे
  • १ टीस्पून हळद
  • २ टीस्पून काश्मिरी लाल तिखट
  • १ टीस्पून धणे पूड
  • १ टीस्पून जिरे पूड
  • ½ टीस्पून गरम मसाला
  • चवीनुसार मीठ
  • आवश्यक तेवढे पाणी
कृती:
  • यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात कांदे, टोमॅटो, लसूण, आलं, काजू टाका.
  • यांनतर एक कप पाणी घालून १०–१२ मिनिटे उकळा.
  • भाज्या छान मऊ झाल्यावर थंड होऊ द्या.
  • हे संपूर्ण मिश्रण मिक्सरमध्ये बारीक, गुळगुळीत पेस्ट बनवा.
  • कढईत तेल आणि बटर गरम करा.
  • त्यात तेजपत्ता, लवंगा, दालचिनी, वेलदोडे घालून परता.
  • आता तयार केलेली पेस्ट घालून ५–७ मिनिटे परतून घ्या.
  • आता हळद, लाल तिखट, धणे पूड, जिरे पूड आणि मीठ घाला.
  • मसाले व्यवस्थित मिसळा आणि मिश्रणाला सुगंध येईपर्यंत शिजवून घ्या.
  • आवश्यकतेनुसार पाणी घालून कन्सिस्टन्सी रेस्टॉरंटसारखी करा.
  • ८–१० मिनिटे ग्रेव्हीला मंद आचेवर उकळू द्या.
  • शेवटी गरम मसाला घालून मिक्स करा आणि तुमची ग्रेव्ही तयार आहे.
डाळ तांदूळ न आंबवता १० मिनिटांमध्ये हिरव्या मुगांपासून बनवा कुरकुरीत डोसा, झटपट तयार होणारी सोपी रेसिपी

कसे साठवावे?

  • पूर्ण थंड झाल्यावर एअरटाइट कंटेनरमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा.
  • फ्रिजमध्ये ही ग्रेव्ही ७–८ दिवस सहज टिकते.
या बेस ग्रेव्हीतून तयार करता येणाऱ्या डिशेस:
  • पनीर बटर मसाला
  • व्हेज हांडी
  • आलू मटर
  • पनीर मसाला
  • दुम आलू
  • कोल्हापुरी ग्रेव्ही
  • काजू करी

Web Title: How to make restaurant style gravy at home it can be use in both veg and non veg dishes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 09:57 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

डाळ तांदूळ न आंबवता १० मिनिटांमध्ये हिरव्या मुगांपासून बनवा कुरकुरीत डोसा, झटपट तयार होणारी सोपी रेसिपी
1

डाळ तांदूळ न आंबवता १० मिनिटांमध्ये हिरव्या मुगांपासून बनवा कुरकुरीत डोसा, झटपट तयार होणारी सोपी रेसिपी

संध्याकाळच्या नाश्त्यात चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा आलू चाट, नोट करा रेसिपी
2

संध्याकाळच्या नाश्त्यात चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा आलू चाट, नोट करा रेसिपी

थंडीत लहान मुलांच्या नाश्त्यासाठी बनवा नाचणीचे हॉट चॉकलेट! शरीरातील सर्वच हाडे होतील मजबूत, नोट करा रेसिपी
3

थंडीत लहान मुलांच्या नाश्त्यासाठी बनवा नाचणीचे हॉट चॉकलेट! शरीरातील सर्वच हाडे होतील मजबूत, नोट करा रेसिपी

कुरकुरीत नाश्ता चहाची मजा वाढवेल, यंदा घरी बटाट्याचे नाही तर लालचुटुक बीटरूट चिप्स बनवून पहा; रेसिपी नोट करा
4

कुरकुरीत नाश्ता चहाची मजा वाढवेल, यंदा घरी बटाट्याचे नाही तर लालचुटुक बीटरूट चिप्स बनवून पहा; रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.