
वाटीभर तांदळाच्या पिठाचा वापर करून सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा कुरकुरीत डोसा
सकाळच्या नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा आणि पराठा इत्यादी पदार्थ आवडीने खाल्ले जातात. पण वारंवार नाश्त्यात तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही वाटीभर तांदळाच्या पिठाचा वापर करून कुरकुरीत क्रिस्पी डोसा बनवू शकता. साऊथ इंडियन पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. तांदूळ आणि उडीद डाळीचा वापर करून बनवलेले पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त पौष्टिक आहेत. पण बऱ्याचदा तांदूळ आणि डाळ भिजत घालण्याचे लक्षात राहत नाही. अशावेळी तुम्ही तांदळाच्या पिठाचा वापर करून खमंग कुरकुरीत डोसा बनवू शकता. खोबऱ्याची चटणी किंवा गरमागरम चहासोबत सुद्धा डोसा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया वाटीभर तांदळाच्या पिठाचा वापर करून डोसा बनवण्याची सोपी कृती. (फोटो सौजन्य – istock)
Christmas 2025 : सणानिमित्त घरी बनवा टेस्टी सर्वांच्या आवडीचा ‘रेड वेल्व्हेट केक’, रेसिपी नोट करा