Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अधिक महिन्यात जावयाला वाण म्हणून देण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा शाही रोझ पिस्ता बर्फी, नोट करा रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये शाही रोझ पिस्ता बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली बर्फी चवीला अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 02, 2026 | 08:00 AM
अधिक महिन्यात जावयाला वाण म्हणून देण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा शाही रोझ पिस्ता बर्फी, नोट करा रेसिपी

अधिक महिन्यात जावयाला वाण म्हणून देण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा शाही रोझ पिस्ता बर्फी, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात अधिक मासाला विशेष महत्व आहे. हा महिना धोंड्याचा महिना म्हणून सुद्धा साजरा केला जातो. विश्वाचे रक्षक भगवान विष्णूला समर्पित करण्यासाठी अधिक मास साजरा करण्याची पद्धत आहे. अधिक मासात जावयाला घरी बोलावून बनवले जातात. अनरसे, मैसूर, इतर फराळातील पदार्थ बनवले जातात. तर जावयाला वाण म्हणून चांदीच्या भेटवस्तू सुद्धा दिल्या जातात. पण अधिक मासात जावयाला देण्यासाठी नवनवीन पदार्थ सुद्धा बनवले जातात. त्यामुळे सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही शाही रोझ पिस्ता बर्फी बनवू शकता. हा पदार्थ घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल. गोड पदार्थ खायला सगळ्यांचं आवडतात. तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही या पद्धतीने शाही रोझ पिस्ता बर्फी बनवू शकता. हा गोड पदार्थ तुम्ही कोणत्याही सणाच्या दिवशी किंवा जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया शाही रोझ पिस्ता बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

दिवसभराचा थकवा होईल मिनिटांमध्ये गायब! घरी आल्यानंतर झटपट बनवा फ्रेश गोड लेमन सोडा, शरीरात राहील थंडावा

साहित्य:

  • मिल्क पावडर
  • दूध
  • तूप
  • पिठीसाखर
  • गुलाब पाणी
  • रोझ इसेन्स
  • खाण्याचा गुलाबी रंग
  • पिस्ते
Rava Dosa: सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा कुरकुरीत रवा डोसा, जाणून घ्या सोपी रेसिपी

कृती:

  • शाही रोझ पिस्ता बर्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करून त्यात मिल्क पावडर आणि दूध घालून मिक्स करा.
  • हळूहळू मिल्क पावडर्ट घट्ट होण्यास सुरुवात होईल. ५ ते ६ मिनिटं सर्व मिश्रण चमच्याने सतत ढवळत राहा. पूर्णपणे घट्टसर मिश्रणाचा गोळा झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या.
  • तयार केलेल्या मिश्रणाचे दोन सामान भाग करून घ्या. एका मिश्रणात पिस्त्याचे तुकडे आणि थोडस हिरवा रंग टाकून मिक्स करा.
    तर दुसऱ्या भागात गुलाबी रंग आणि रोझ एसेन्स घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • ट्रेला तूप लावून घ्या. त्यानंतर त्यात सगळ्यात आधी पिस्ता टाकून तयार केलेले मिश्रण टाका आणि चमच्याने एकसमान पसरवून घ्या.
  • त्यानंतर पिस्त्याचे काप आणि इतर सुका मेवा घालून हलक्या हाताने दाब द्या. त्यानंतर त्यावर तयार केलेले रोझचे मिश्रण टाकून एकसमान पसरावा आणि हलक्या हाताने दाब द्या.
  • त्यानंतर ट्रे फ्रिजमध्ये सेट करण्यासाठी ३० मिनिटं ठेवून द्या. व्यवस्थित सेट झाल्यानंतर सुरीच्या मदतीने तुम्हाला हवे त्या आकारात तुकडे करून घ्या आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सजावट करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली शाही रोझ पिस्ता बर्फी.

Web Title: How to make shahi rose pistachio barfi at home simple sweet recipe shahi rose pistachio barfi recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी
1

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
2

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
3

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
4

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.