सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हलके, चविष्ट आणि पटकन तयार होणारे खायचे असेल, तर रवा डोसा हा उत्तम पर्याय ठरू शकतो. पारंपरिक डोश्यासाठी पीठ भिजवून ठेवावे लागते, मात्र रवा डोसा अगदी कमी वेळात तयार होतो. दही आणि रव्यापासून बनणारा हा डोसा डोसा सा हलका आणि पचायला सोपा जातो. दह्यामुळे शरीराला प्रोटीन आणि कॅल्शियम मिळते, तर रव्यामुळे ऊर्जा मिळण्यास मदत होते. त्यामुळे हा पदार्थ मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आरोग्यदायी मानला जातो. तुम्हालाही सकाळच्या नाश्त्याला झटपट टेस्टी पदार्थ बनवायचा असेल तर ही क्रिस्पी रवा डोसाची ही सोपी रेसिपी जाणून घ्या.
Papaya Health Facts: कच्ची पपई खाणे फायदेशीर की हानिकारक? आरोग्यावर काय परिणाम होतो?
१कप बारीक रवा
अर्धा कप दही
अर्धा कप तांदळाचे पीठ
१बारीक चिरलेला कांदा
१-२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
२ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
अर्धा चमचा जिरे
चवीनुसार मीठ
आवश्यकतेनुसार पाणी
डोसा भाजण्यासाठी तेल किंवा तूप
सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात रवा, दही आणि तांदळाचे पीठ एकत्र मिसळा. त्यात पाणी घालून पातळसर पीठ तयार करा. गुठल्या राहणार नाही याची काळजी घ्या. त्यानंतर त्यात कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे आणि चवीनुसार मीठ घाला. हे मिश्रण १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा, जेणेकरून रवा चांगला फुगेल. यानंतर तवा गरम करून त्यावर थोडे तेल लावा. तयार पीठ तव्यावर पातळ पसरवा आणि मध्यम आचेवर भाजा. डोसाच्या कडा सोनेरी आणि कुरकुरीत झाल्यानंतर तो पलटून दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्या. गरमागरमा रवा डोसा नारळाची चटणी, टोमॅटो चटणी किंवा सांबारसोबत सर्व्ह करा. तुम्ही यामध्ये बटाट्याचा मसालाही भरु शकता, ज्यामुळे त्याची चव आणखी वाढते.
Health Tips: अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने खरंच वजन वाढतं? जाणून घ्या यामागचे सत्य






