
जेवणाच्या डब्यासाठी काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा ढाबास्टाईल चमचमीत शेव भाजी, नोट करा रेसिपी
सकाळच्या वेळी सगळ्यांचं खूप जास्त घाई असते. घाईच्या दिवशी जेवणाच्या डब्यात नेमकी काय भाजी बनवावी बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी एक तर बेसन पिठाची पोळी किंवा भाज्या बनवल्या जातात. पण नेहमीच्या त्याच ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही डब्यासाठी शेव भाजी बनवू शकता. कांदा टोमॅटो आणि झणझणीत मसाल्यांचा वापर करून बनवलेली शेव भाजी चवीला अतिशय सुंदर लागते. हा पदार्थ पावसोबत सुद्धा मस्त लागतो. वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेल्या भाज्या केवळ चवीसाठीच नाहीतर शरीरासाठी सुद्धा खूप जास्त गुणकारी असतात. जेवणाची चव वाढवण्यासाठी किंवा पाहुण्यांच्या स्वागतासाठी या पद्धतीने शेव भाजी बनवू शकता. सगळेच अतिशय आवडीने खातील. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)