जेवणाची चव वाढवण्यासाठी दुपारच्या जेवणात झटपट बनवा शेवग्याची कढी
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडाव्याची आवश्यकता असते. शरीरात वाढलेली उष्णता नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात अनेक वेग्वेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते.लिंबू सरबत, आइस्क्रिम, बर्फाचा गोळा, दही, ताक, लस्सी इत्यादी अनेक पदार्थांचे सेवन केले जाते. या दिवसांमध्ये ताक पिणे आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. ताकामध्ये असलेले गुणधर्म शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकतात. त्यामुळे दुपारच्या वेळी जेवणात नेहमी ताकाचे सेवन करावे. यापूर्वी तुम्ही ताकाची कढी बऱ्याचदा खाल्ली असेल, मात्र आज आम्ही तुम्हाला शेवग्याच्या शेंगांची कढी कशी बनवावी, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कारण दुपारच्या जेवणात नेहमीच डाळ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी झटपट शेवग्याची कढी तुम्ही बनवू शकता. शेवग्याच्या शेंगा हाडांच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत.(फोटो सौजन्य – iStock)
चिकन लव्हर्ससाठी खास; एकदा घरी नक्की बनवून पहा हॉटेल स्टाईल Afghani Chicken Tikka
Mango Puranpoli Recipe: आंब्याचा गर आणि पुरणपोळीचा अनोखा संगम; आंब्याची पुरणपोळी कधी खाल्ली आहे का?