Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तोंडात विरघळणारे स्वादिष्ट डेझर्ट! लालचुटुक स्ट्रॉबेरीपासून घरीच बनवा खमंग हलवा, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये स्ट्रॉबेरी हलवा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा चांगली लागते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 07, 2026 | 03:30 PM
तोंडात विरघळणारे स्वादिष्ट डेझर्ट! लालचुटुक स्ट्रॉबेरीपासून घरीच बनवा खमंग हलवा, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

तोंडात विरघळणारे स्वादिष्ट डेझर्ट! लालचुटुक स्ट्रॉबेरीपासून घरीच बनवा खमंग हलवा, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं गोड पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. अनेक घरांमध्ये जेवणानंतर शिरा, बासुंदी किंवा एखादा गोड पदार्थ आणून खाल्ला जातो. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये घरी काहीतरी नवीन बनवून पाहावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये स्ट्रॉबेरी हलवा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. आंबटगोड लालचुटुक स्ट्रॉबेरीपासून बनवलेला हलवा चवीला अतिशय सुंदर लागतो. याशिवाय पाहुणे घरी आल्यानंतर घाईगडबडीच्या वेळी गोड पदार्थ काय बनवावा, बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी स्ट्रॉबेरी हलवा तुम्ही बनवू शकता. कधी कधी बाजारात स्ट्रॉबेरी उपलब्ध नसतात, त्यावेळी तुम्ही अननस, आंबा किंवा केळी टाकून सुद्धा हलवा बनवू शकता. स्ट्रॉबेरी हे फळ केवळ चवीसाठीच नाहीतर त्वचेसाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. स्ट्रॉबेरीमध्ये असलेले विटामिन सी आणि इतर आवश्यक पोषक घटक आरोग्य त्वचा ग्लोइंग आणि चमकदार ठेवतात. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe : तुम्ही कधी केळ्याची काॅफी ट्राय केली आहे का? शेफ कुणाल कपूरने शेअर केली रेसिपी

साहित्य:

  • स्ट्रॉबेरी
  • रवा
  • साखर
  • वेलची पावडर
  • सुका मेवा
  • तूप
  • दूध
जास्त पिकलेला खरबूज फेकून देण्याऐवजी ५ मिनिटांमध्ये बनवा खरबूज शेक, कडाक्याच्या उन्हाळ्यात राहाल रिफ्रेशिंग

कृती:

  • स्ट्रॉबेरी हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम, स्ट्रॉबेरी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर मध्यम आकारात तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पेस्ट तयार करा.
  • कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा. गरम तुपात सुका मेवा भाजून घ्या आणि काढून घ्या.
  • त्यानंतर पुन्हा एकदा तूप टाकून गरम झाल्यानंतर त्यात रवा घालून मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजा. रवा कायमच मंद आचेवर भाजावा. यामुळे कढईला खाली चिकट नाही.
  • भाजलेला रवा ताटात काढून घ्या. कढईमध्ये तूप गरम करून त्यात तयार केलेली स्ट्रॉबेरी पेस्ट घालून भाजून घ्या. यामुळे स्ट्रॉबेरीचा कच्चेपणा निघून जाईल आणि पदार्थाची चव वाढेल.
  • स्ट्रॉबेरी पेस्ट गरम झाल्यानंतर त्यात भाजलेला रवा घालून चमच्याने सतत मिक्स करत राहा. यामुळे गुठळ्या पूर्णपणे मोडून जातील.
  • त्यानंतर त्यात आवश्यतेनुसार दूध घालून रवा झाकण मारून शिजण्यासाठी ठेवा. रवा शिजल्यानंतर त्यात तुमच्या आवडीनुसार साखर घालून मंद आचेवर व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • सगळ्यात शेवटी वेलची पावडर आणि भाजलेला सुका मेवा घालून व्यवस्थित हलवा मिक्स करून घ्या. आवश्यकता वाटल्यास वरून चमचाभर तूप टाकावे.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला स्ट्रॉबेरी हलवा.

Web Title: How to make strawberry halwa at home simple food recipe strawberry halwa recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
1

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
2

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
3

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी
4

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.