जास्त पिकलेला खरबूज फेकून देण्याऐवजी ५ मिनिटांमध्ये बनवा खरबूज शेक, कडाक्याच्या उन्हाळ्यात राहाल रिफ्रेशिंग
कडाक्याच्या उन्हाळ्यात प्रत्येकाला काहींना काही थंडगार पिण्याची किंवा खाण्याची इच्छा होतेच. ताक, लस्सी, आईस्क्रीम किंवा वेगवेगळे रिफ्रेशिंग शेक बनवून प्यायले जातात. तसेच उन्हाळा वाढल्यानंतर शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. यामुळे थकवा आणि अशक्तपणा वाढतो. अशावेळी वेगवेगळ्या पाणीदार फळांचे सेवन करण्याचा सल्ला डॉक्टरसुद्धा देतात. फळे खरेदी करून आणल्यानंतर ती जास्त दिवस तशीच राहिल्यामुळे खूप जास्त पिकतात आणि मऊ होऊन जातात. जास्त मऊ झालेली पाहिल्यानंतर ती खाण्यास लहान मुलं कंटाळा करतात. अशावेळी शिल्लक राहिलेल्या फळांपासून तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये शेक बनवू शकता.म्हणूनच आज आम्ही तुम्हाला खरबूज शेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले खरबूज शेक घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल आणि चव सुद्धा भारी लागेल. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपण कमी करण्यासाठी खरबूज शेक अतिशय उत्तम आहे. जाणून घ्या रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
Recipe : पाैष्टिक आणि टेस्टी, जेवणानंतर काही गोड होऊन जाऊद्यात… दुधीभोपळ्यापासून घरी बनवा ‘कलाकंद’






