Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळच्या जेवणात काय बनवावं सुचत नाही? झटपट बनवा चिंच गुळाची आंबट तिखट आमटी, नोट करून घ्या पदार्थ

जेवणात नेहमीच डाळ खाऊन कंटाळा आल्यास तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये चिंच गुळाची झणझणीत आमटी बनवू शकता. ही आमटी चवीला अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया चिंच गुळाची आमटी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 13, 2025 | 01:45 PM
झटपट बनवा चिंच गुळाची आंबट तिखट आमटी

झटपट बनवा चिंच गुळाची आंबट तिखट आमटी

Follow Us
Follow Us:

रात्रीच्या जेवणात बऱ्याचदा डाळ किंवा तिखट आमटी बनवली जाते. मुगाची आणि तूरडाळची वापरून बनवलेली डाळ चवीला अतिशय सुंदर आणि चविष्ट लागते. मात्र नेहमीच साधे वरण खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही झटपट चिंच गुळाची आंबट गोड आमटी बनवू शकता. आंबट तिखट आमटी जेवणात असेल तर चार घास जेवण जास्त जात. आंबट तिखट आमटी तुम्ही चपाती, भाकरी आणि भातासोबत खाऊ शकता. घरातील लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं तुम्ही बनवलेली चिंच गुळाची आमटी खूप जास्त आवडेल. गूळ आणि चिंच आरोग्यासाठी गुणकारी असतात. गूळ खाल्यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो, तर चिंच खाल्यामुळे पचनाची समस्या उद्भवत नाही. चला तर जाणून घेऊया चिंच गुळाची आंबट तिखट आमटी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

पारंपरिक पद्धतीमध्ये झटपट बनवा झणझणीत कांदा लसूण मसाला, जेवणाला येईल चटकदार चव

साहित्य:

  • शिजवलेले तूर आणि मुगाची डाळ
  • चिंच
  • गूळ
  • लाल तिखट
  • हळद
  • तेल
  • मोहरी
  • जिरं
  • कढीपत्ता
  • गोडा मसाला
  • कोथिंबीर
  • गरम मसाला
शरीर ताजेतवाने आणि फ्रेश ठेवण्यासाठी घरी बनवा थंडगार लिची सरबत, लहान मुलांसह मोठ्यांनाही आवडेल

कृती:

  • आंबट तिखट चिंच गुळाची आमटी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरमध्ये अर्धा वाटी मुगडाळ आणि अर्धा वाटी तूरडाळ घेऊन काहीवेळ भिजत ठेवा.
  • त्यानंतर कुकरमध्ये पाणी घालून शिट्ट्या काढून डाळ शिजवा. वाटीभर पाण्यात चिंच भिजण्यासाठी ठेवा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं आणि बारीक चिरुन घेतलेली लसूण टाकून भाजा. नंतर त्यात कढीपत्ता घाला.
  • नंतर त्यात लाल तिखट आणि हळद घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात खोबऱ्याच्या वाटपाचा मसाला घालून भाजून घ्या.
  • मसाला शिजल्यानंतर त्यात मिक्स करून घेतलेली डाळ घालून व्यवस्थित उकळी काढून घ्या.
  • उकळी आल्यानंतर त्यात चिंचेचा रस, बारीक चिरून घेतलेला गूळ आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
  • डाळीला व्यवस्थित उकळी आल्यानंतर सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आंबट गोड चिंच आमटी.

Web Title: How to make tamarind jaggery amati at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2025 | 01:45 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

संध्याकाळ होईल आणखीनच स्पेशल! झटपट बनवा चीज स्टफ्ड मशरूम बाइट्स, प्रत्येक घासात लागेल भन्नाट चटकदार चव
1

संध्याकाळ होईल आणखीनच स्पेशल! झटपट बनवा चीज स्टफ्ड मशरूम बाइट्स, प्रत्येक घासात लागेल भन्नाट चटकदार चव

पावसाळ्यात आवर्जून खायला हवी करटोलीची रानभाजी, आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली भाजी शरीरासाठी ठरेल गुणकारी
2

पावसाळ्यात आवर्जून खायला हवी करटोलीची रानभाजी, आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली भाजी शरीरासाठी ठरेल गुणकारी

Recipe : विकेंड करा खास, घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल क्रिमी आणि मसालेदार ‘बटर चिकन’, रेसिपी आहे फार सोपी
3

Recipe : विकेंड करा खास, घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल क्रिमी आणि मसालेदार ‘बटर चिकन’, रेसिपी आहे फार सोपी

घरी आलेल्या पाहुण्यांचे राजेशाही थाटात करा स्वागत! झटपट बनवा चविष्ट गुलकंद फिरनी, नोट करा रेसिपी
4

घरी आलेल्या पाहुण्यांचे राजेशाही थाटात करा स्वागत! झटपट बनवा चविष्ट गुलकंद फिरनी, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.