शरीर ताजेतवाने आणि फ्रेश ठेवण्यासाठी घरी बनवा थंडगार लिची सरबत
चवीला आंबटगोड असलेली लिची आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. कडक उन्हाळ्यात लिचीचे सेवन केल्यास शरीरात वाढलेली उष्णता नियंत्रणात राहील. यामध्ये कार्बोहाइड्रेट, विटामिन सी, विटामिन ए आणि बी कॉम्प्लेक्स, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नीशियम, फॉस्फोरस आणि आयरन इत्यादी अनेक घटक आढळून येतात. याशिवाय लिची खाल्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. लिचीपासून ज्युस, आईस्क्रीम, सरबत, जेली, चॉकलेट, लिची क्रश इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. लिची हे हंगामी फळं असून यामुळे उच्च रक्तदाब, वजन कमी करणे, लठ्ठपणा यांसारख्या अनेक समस्यांपासून आराम मिळतो. उन्हाळा वाढल्यानंतर ताक, नारळ पाणी किंवा कोल्ड्रिंक्सचे सेवन केले जाते. मात्र नेहमीच तेच पदार्थ पिऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये लिचीची थंडगार सरबत बनवू शकता. यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होऊन शरीर थंड आणि फ्रेश राहील. जाणून घ्या लिचीची सरबत बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
कडक उन्हाळ्यात घरी बनवा थंडगार कालाखट्टा सरबत, चव चाखून घरातील सगळेच करतील गोड कौतुक