Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजिबात भासणार नाही चटणीची गरज! सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा लालचुटुक टोमॅटोचा चविष्ट डोसा, नोट करा रेसिपी

लहान मुलांना टोमॅटो खायला अजिबात आवडत नाही.अशावेळी मुलांना तुम्ही टोमॅटोपासून चटकदार कुरकुरीत डोसा बनवून देऊ शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 16, 2026 | 10:09 AM
अजिबात भासणार नाही चटणीची गरज! सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा लालचुटुक टोमॅटोचा चविष्ट डोसा

अजिबात भासणार नाही चटणीची गरज! सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा लालचुटुक टोमॅटोचा चविष्ट डोसा

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं, हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. कामाच्या धावपळीमध्ये बऱ्याचदा नाश्ता बनवण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. सतत काम करत राहिल्यामुळे नाश्त्याची वेळ चुकून जाते आणि कोणताही पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. अशावेळी नाश्त्यात झटपट तयार होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. सकाळच्या नाश्त्यात सगळ्यांचं हेल्दी पण कमीत कमी साहित्यात तयार होणारे पदार्थ खाण्यास हवे असतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाटीभर टोमॅटोच्या गरापासून कुरकुरीत डोसा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. डोसा, इडली हे पदार्थ दक्षिण भारतीय संस्कृतीमधील अविभाज्य घटक आहेत. कायमच साधा डोसा आणि त्यासोबत खोबऱ्याची चटणी किंवा सांबार खाल्ले जाते. पण नेहमीच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी नाश्त्यात टोमॅटो डोसा बनवावा. हा पदार्थ अतिशय कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि जास्त साहित्यसुद्धा लागत नाही. टोमॅटो डोसासोबत तुम्हाला कोणतीही चटणी बनवण्याची आवश्यकता नाही. चला तर जाणून घेऊया टोमॅटो डोसा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

हिरव्यागार पेरूंपासून झटपट बनवा चमचमीत पेरूची चटणी, लहान मुलांसह मोठेसुद्धा आवडीने खातील पदार्थ

साहित्य:

  • टोमॅटो
  • लाल सुक्या मिरच्या
  • आलं
  • लसूण
  • मीठ
  • बारीक रवा
  • गव्हाचं पीठ
  • मीठ
  • जिरं
  • कांदा
  • कोथिंबीर
  • पाणी
  • तेल
बोरिंग पोहे सोडा, यंदा नाश्त्याला बनवा विदर्भ स्टाईल झणझणीत ‘तर्री पोहे’, सकाळचा नाश्ता होईल रंगतदार

कृती:

  • टोमॅटो डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो, आलं, लाल सुक्या मिरच्या, बारीक रवा, गव्हाचे पीठ, तांदुळाचे पीठ, चवीनुसार मीठ आणि थोडस पाणी घालून बारीक पेस्ट बनवून घ्या.
  • आवश्यकता वाटल्यास तुम्ही त्यात पाणी घालू शकता. तयार केलेल्या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, जिरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेले मिश्रण काहीवेळ बाजूला ठेवून घ्या. डोसा बनवताना पिठात जास्त पाणी घालू नये.
  • डोसा बनवण्यासाठी पॅन गरम करा. गरम पॅनला तेल लावून त्यावर तयार केलेले डोसा पीठ गोलाकार पसरवून घ्या. त्यानंतर डोसा दोन्ही बाजूने भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला कुरकुरीत टोमॅटो डोसा. हा डोसा नुसताच चहासोबत किंवा सकाळच्या नाश्त्यात सुद्धा खाऊ शकता.

Web Title: How to make tomato dosa at home simple breakfast recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 10:09 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Nankhatai Recipe: ‘या’ टिप्स फाॅलो करून प्रेशर कुकरमध्ये बनवा बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई, खाताना प्रत्येकजण करेल कौतुक
1

Nankhatai Recipe: ‘या’ टिप्स फाॅलो करून प्रेशर कुकरमध्ये बनवा बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई, खाताना प्रत्येकजण करेल कौतुक

Coconut Chutney Recipe: अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवा ओल्या खोबऱ्याची झणझणीत चटणी, कोणत्याही पदार्थासोबत लागेल भन्नाट चव
2

Coconut Chutney Recipe: अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवा ओल्या खोबऱ्याची झणझणीत चटणी, कोणत्याही पदार्थासोबत लागेल भन्नाट चव

Weight Loss: वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग सकाळच्या नाश्त्यात करा दुधी भोपळ्याच्या सूपचे सेवन, पोटावरील चरबी जाईल वितळून
3

Weight Loss: वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग सकाळच्या नाश्त्यात करा दुधी भोपळ्याच्या सूपचे सेवन, पोटावरील चरबी जाईल वितळून

जीभेवर ठेवताच विरघळणारे मऊ आणि चवदार चुरमा लाडू बनवण्याची सर्वात सोपी पद्धत; प्रत्येकजण विचारेल रेसिपी!
4

जीभेवर ठेवताच विरघळणारे मऊ आणि चवदार चुरमा लाडू बनवण्याची सर्वात सोपी पद्धत; प्रत्येकजण विचारेल रेसिपी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.