
रात्रीच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा टोमॅटोचा आंबटगोड सार
चवीला आंबटगोड लागणारे टोमॅटो आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. जेवणातील प्रत्येक पदार्थ बनवताना टोमॅटोचा वापर केला जातो. जेवणाचा सुगंध, चव वाढवण्यासाठी टोमॅटोचा वापर केला जातो. नेहमीच भातासोबत डाळ किंवा तिखट वरण खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये टोमॅटोचा आंबटगोड सार बनवू शकता. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं टोमॅटोचा सार खायला खूप आवडतो. जेवणात भात, टोमॅटोचा सार आणि मच्छी असेल तर जेवण जेवल्यासारखे वाटते. टोमॅटोचा सार चवीला अतिशय सुंदर लागतो. त्यामुळे वारंवार डाळ किंवा इतर तिखट पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही टोमॅटोचा आंबटगोड सार बनवू शकता. चला तर जाणून घेऊया टोमॅटोचा सार बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)