उष्माघाताच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा आंबटगोड जलजिरा
कडक उन्हाळ्यात सगळ्यांचं सतत काहींना काही थंड पिण्याची किंवा खाण्याची इच्छा होते. यादिवसांमध्ये प्रामुख्याने नारळ पाणी, सरबत, फळांचा रस, कोल्ड्रिंक इत्यादी अनेक पेय मोठ्या प्रमाणावर प्यायली जातात. उन्हामध्ये बाहेर जाऊन आल्यानंतर शरीरातील पाणी कमी होऊन जाते. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे या दिवसांमध्ये लिंबू पाणी किंवा शरीराला ऊर्जा देणाऱ्या पेयांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला कडक उन्हाळ्यात सोप्या पद्धतीमध्ये आंबटगोड जलजिरा पिण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही बनवलेला जलजिरा घरातील लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)