अस्सल मालवणी पद्धतीमध्ये बनवा काळ्या वाटण्याची चविष्ट उसळ
सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी अनेक घरांमध्ये आंबोळी हा पदार्थ बनवला जातो. आंबोळी बनवल्यानंतर त्यासोबत खोबऱ्याची चटणी किंवा नारळाचे दूध खाण्यास दिले जाते. पण कोकणातील प्रत्येक घरात आंबोळया बनवल्यानंतर त्यासोबत खाण्यासाठी काळ्या वाटण्याची उसळ बनवली जाते. आंबोळी आणि काळ्या वाटण्याची उसळ हे कॉम्बिनेशन चवीला अतिशय सुंदर लागते. मात्र काहीवेळा मालवणी पद्धतीमध्ये बनवली जाणारी काळ्या वाटण्याची उसळ घरात व्यवस्थित बनत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अस्सल मालवणी पद्धतीने बनवली जाणारी काळ्या वाटण्याची उसळ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीमध्ये काळ्या वाटण्याची उसळ चवीला अतिशय सुंदर लागेल. या उसळ सोबत तुम्ही भात, भाकरी किंवा इतर कोणतेही पदार्थ खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया काळ्या वाटण्याची उसळ बनवण्याची सोपी रेसिपी.
Muramba Recipe: कच्च्या कैरीपासून घरी बनवा आंबट गोड मुरांबा; जाणून घ्या पारंपरिक रेसिपी