चेहरा हा एक असा अंग आहे, ज्याची काळजी सर्वांनाच असते. प्रत्येकाला आपला चेहरा सुंदर दिसावा असे वाटत असते. विशेष करून महिला वर्ग आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक नवनवीन मेकअप प्रोडक्टसचा वापर करत असतात. मात्र अनेक मेकअप प्रोडक्टस रासायनिक पदार्थांनी मिश्रित असल्याचे आपल्या चेहऱ्यासाठी ते घातक ठरत असतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, चेहऱ्याच्या सौंदर्यवाढीसाठी तुम्ही व्हिटॅमिन सी सिरमचा वापर करू शकता. व्हिटॅमिन सी चेहऱ्यावरील डाग दूर करते आणि वृद्धत्व कमी करते.
व्हिटॅमिन सी त्वचेमध्ये कोलेजनचे उत्पादन वाढवते. यामुळे सूज आणि फ्रिकल्सची समस्या कमी होते. पिगमेंटेशन कमी करण्यासाठी व्हिटॅमिन सी सीरम लागू करण्याची शिफारस केली जाते. व्हिटॅमिन सी सीरम त्वचा बरे करण्यासाठी प्रभावी मानले जाते. बाजारात वेगवेगळ्या ब्रँडचे सीरम उपलब्ध आहेत. मात्र आता तुम्ही घरच्या घरी व्हिटॅमिन सी बनवू शकता. यासाठी तुम्हाला काही गोष्टींची आवश्यकता असेल. आज आम्ही तुम्हाला व्हिटॅमिन सीची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. याने तुमचे जास्त पैसेही जाणार नाहीत आणि तुमच्या चेहऱ्याची निगाही राखली जाईल.
हेदेखील वाचा – केस धुतल्यानंतर सुद्धा केसांना वास येतो? मग नियमित करा ‘या’ घरगुती पदार्थांचा वापर