देशभरात पावसाने सगळीकडे दमदार हजेरी लावली आहे. महाराष्ट्रातील सर्वच भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. तर पुढील ३ ते ४ दिवस राज्यभरात जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील काही भागात पाऊस पडत आहे तर काही भागांमध्ये अजूनही ऊन आहे. त्यामुळे वातावरणात सतत बदल होत आहेत.वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आपल्या आरोग्यावर सुद्धा दिसून येतो. राज्यात झालेल्या मान्सूनच्या आगमनामुळे उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
पावसाळच्या दिवसांमध्ये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण साथीच्या आजारांमुळे ताप, सर्दी, खोकला, उलट्या किंवा आरोग्यासंबंधित इतर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. पावसाळ्यात विशेषता लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांची जास्त काळजी घ्यावी. कारण यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे लहान मुले अनेक वेगवेगळ्या आजारांना बळी पडू शकतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये लहान मुलांची कश्या पद्धतीने काळजी घ्यावी, याबद्दल काही महत्वाच्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
पावसाळ्यात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी:
कपड्यांची काळजी घ्यावी:
लहान मुले बाहेर खेळण्यासाठी किंवा बाहेर फिरण्यासाठी जातात. तेव्हा त्यांना डास चावण्याची शक्यता असते. हे डास चावू नये म्हणून त्यांना पूर्ण अंग झाकलेले कपडे घालावे, जेणेकरून डास चावणार नाहीत. वातावरणात सतत बदल होत असतात. या बदलांचा परिणाम आपल्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे वातावरणाचा परिणाम मुलांवर होऊ शकतो.
[read_also content=”केळी घरी आणल्यानंतर लगेच खराब होत असतील तर दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स वापरा https://www.navarashtra.com/lifestyle/important-tips-to-keep-bananas-fresh-545534.html”]
लसीकरण करणे आवश्यक आहे:
लहान मुलांचे लसीकरण करणे फार आवश्यक आहे. सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आरोग्यासंबंधित समस्या या दिवसांमध्ये वाढू लागतात. लहान मुलांची रोगप्रतिकाशक्ती कमी असल्याने त्यांना लगेच फ्लू होण्याची शक्यता असते. पावसाळ्यामध्ये डेंग्यू, मलेरिया या आजाराचे रुग्ण जास्त असल्याने पालकांनी लहान मुलांचे लसीकरण आवश्यक करून घ्यावे.
[read_also content=”50 व्या वर्षीही तरूणींना लाजवेल असा फिटनेस आणि सौंदर्य, काय आहे मलायकाचे रहस्य https://www.navarashtra.com/lifestyle/what-is-the-secret-of-malaikas-fitness-and-beauty-545476.html”]
मुलांना रोज अंघोळ घाला:
अनेक पालक पावसाळ्यातील थंड वातावरणामुळे लहान मुलांना अंघोळ घालत नाही. पण असे करू नये. लहान मुलांना सर्वच ऋतूंमध्ये नियमित अंघोळ घालावी. अंघोळ घालण्याआधी मशील करून कोमट पाण्याने अंघोळ घाला. वातावरणात बदल झाल्यानंतर मुलांना शक्यतो गरम पाण्याने अंघोळ घालावी.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.






