विटामिन ई कॅप्सूलचा वापर त्वचेसाठी कसा करावा
सर्वच महिला सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. पण शरीरात होणारे हार्मोनल बदल, शरीरात असणारी आहाराची कमतरता, अपुरी झोप, सतत काम करत राहणे इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. याचे परिणाम हळूहळू चेहऱ्यावर सुद्धा दिसून येतात. अनेक महिला सुंदर त्वचेसाठी बाजारात मिळणाऱ्या विटामिन ई कॅप्सूलचा वापर करता. चेहऱ्याच्या आरोग्यासाठी विटामिन ई महत्वाचे आहे. चेहऱ्याला बाहेरून क्रीम किंवा इतर गोष्टी लावल्यानंतर काही वेळेपुरता चेहरा सुंदर आणि चमकदार दिसतो. मात्र त्वचा आणि शरीराला आतून पोषण देण्यासाठी आहारात योग्य त्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे.
विटामिन ई कॅप्सूल चेहऱ्यावर लावल्यानंतर काही दिवसांमध्येच फरक दिसून येतो. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. यामुळे त्वचेचा रंग सुधारून त्वचा गोरीपान आणि चमकदार दिसते. पण काही महिला चुकीच्या पद्धतीने विटामिन ई कॅप्सूलचा वापर करतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला योग्य पद्धतीने विटामिन ई कॅप्सूल चेहऱ्यावर कशी लावायची याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: सनग्लासेस लगेच खराब होतात का? नवीन दिसण्यासाठी सोपे उपाय करुन बघा
विटामिन ई कॅप्सूलचा वापर योग्य पद्धतीने केल्यास चेहऱ्यावर लवकर चमक दिसून येईल. हे एक प्रभावी अँटीऑक्सिडंट असून त्वचेच्या पेशींना हानी पोहोचवणाऱ्या फ्री रॅडिकल्सपासून लढण्यासाठी मदत करतात. आठवड्यतून एकदा किंवा दोनदा या कॅप्सूलचा वापर केल्यास त्वचा मुलायम आणि चमकदार होते. विटामिन ई कॅप्सूलमधील तेल त्वचेला आवश्यक आर्द्रता पुरवून त्वचा कोरडी होण्यापासून वाचवतो. तसेच त्वचेचा काळा पडलेला रंग सुधारण्यासाठी विटामिन ई कॅप्सूल वापरावी.
हे देखील वाचा: ठराविक वाराला परिधान करा काही ठराविक रंग; मिळेल सुख समृद्धी, मनाची शांती
कोणतेही प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा त्वचेचा सूट होतील असेच प्रॉडक्ट वापरावे. जेणेकरून त्वचेचा रंग आणि पोत खराब होणार नाही. विटामिन ई कॅप्सूलचा वापर करताना एका वाटीमध्ये थोडेसे तेल घेऊन त्यात विटामिन ई कॅप्सूल मिक्स करावी. त्यानंतर हलक्या हाताने त्वचेवर मालिश करून घ्या. मसाज करून झाल्यानंतर काही वेळाने त्वचा स्वच्छ धुवून घ्या. असे केल्यामुळे त्वचेवर अतिरिक्त तेल जमा होणार नाही. तेलकट त्वचा असलेल्या महिलांनी अशा पद्धतीने त्वचेची काळजी घ्यावी.