Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात हलके पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा कलिंगड मक्याचे सॅलड, पचनक्रिया राहील सुरळीत

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आहारात हलक्या पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कलिंगड मक्याच्या दाण्यांचे सॅलड बनवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 07, 2026 | 11:25 AM
उन्हाळ्यात हलके पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा कलिंगड मक्याचे सॅलड, पचनक्रिया राहील सुरळीत

उन्हाळ्यात हलके पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा कलिंगड मक्याचे सॅलड, पचनक्रिया राहील सुरळीत

Follow Us
Follow Us:

तीव्र उष्णता आणि सतत येणाऱ्या घामामुळे शरीरात खूप जास्त थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. बऱ्याचदा भूक लागल्यानंतर वेगवेगळ्या टेस्टी पदार्थाचे सेवन केले जाते. दुपारच्या जेवणात किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात तिखट आणि अतिमसालेदार पदार्थ आणून खाल्लेले जातात. पण हे पदार्थ खाल्ल्यानंतर पोटात उष्णता वाढते आणि अपचनाच्या समस्या वाढून आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी लागलेली हलकी भूक भागवण्यासाठी घरच्या घरी कलिंगड मक्याचे सॅलड बनवावे. सॅलड खाल्ल्यामुळे पोट सुद्धा दीर्घकाळ भरलेले राहते आणि पचनक्रिया सुद्धा सुरळीत चालू राहते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात कलिंगड उपलब्ध असतात. कलिंगडमध्ये ९२ टक्के पाणी असते, ज्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी कलिंगड आणि इतर पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. कलिंगड मक्याच्या दाण्यांचे सॅलड लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

ओव्हनची भासणार नाही गरज! १० मिनिटांमध्ये तव्यावरच बनवा टेस्टी गार्लिक ब्रेड, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • कलिंगड
  • मक्याचे दाणे
  • पुदिन्याची पाने
  • लिंबाचा रस
  • काळीमिरी पावडर
  • चाट मसाला
  • काळे मीठ
फक्त ३ साहित्यांपासून साखर न वापरता बनवा हेल्दी चॉकलेट मूस केक; मुलांसाठी परफेक्ट डेझर्ट

कृती:

  • कलिंगड मक्याच्या दाण्यांचे सॅलड बनवण्यासाठी, कलिंगडची साल काढून बारीक तुकडे करा. त्यासोबतच त्यातील बिया सुद्धा काढून घ्याव्यात.
  • कुकरमध्ये वाटीभर मक्याचे दाणे, चवीनुसार मीठ आणि पाणी घालून कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये बारीक केलेले कलिंगड, मक्याचे दाणे आणि स्वच्छ धुवून घेतलेली पुदिन्याची पाने टाका आणि मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात लिंबाचा रस, काळीमिरी पावडर, चाट मसाला, काळे मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले कलिंगड मक्याच्या दाण्यांचे सॅलड.

Web Title: If you want to eat light food in summer make watermelon corn salad quickly digestion will be smooth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • cooking tips
  • food recipe
  • Summer Food

संबंधित बातम्या

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद
1

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत
2

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत

Tomato Rice Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! १० मिनिटांमध्ये साऊथ इंडियन पद्धतीने बनवा टेस्टी टोमॅटो राईस, नोट करा रेसिपी
3

Tomato Rice Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! १० मिनिटांमध्ये साऊथ इंडियन पद्धतीने बनवा टेस्टी टोमॅटो राईस, नोट करा रेसिपी

चविष्ट अन् पाैष्टिक… तुम्ही खाल्लीये का कधी बाजरीची खिचडी, चवीला लागते मजेदार; रात्रीच्या जेवणाला नक्की ट्राय करा
4

चविष्ट अन् पाैष्टिक… तुम्ही खाल्लीये का कधी बाजरीची खिचडी, चवीला लागते मजेदार; रात्रीच्या जेवणाला नक्की ट्राय करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.