फोटो सौजन्य - मॅमोथ लेक्स टुरिझम
मॅमोथ लेक्सचे स्नोशूइंग ट्रेल्स
मॅमोथ लेक्स हे हिवाळ्यातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी प्रत्येक बर्फाळ हंगामात विविध उपक्रम आणि अनुभव घेता येतात. येथे हिवाळ्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्नोशूइंग. ही संपूर्ण कुटुंबासाठी सोपी आणि आनंददायक कृती आहे, जी निसर्गप्रेमी आणि साहसप्रिय व्यक्तींसाठी खास अनुभव देते. मॅमोथ लेक्सच्या सभोवताली तीन मिलियन एकरांहून अधिक क्षेत्रफळावर जंगल आणि सार्वजनिक जमीन असून, स्नोशूइंगमुळे या भागातील सुंदर आणि दुर्गम ठिकाणी पोहोचणे शक्य होते.
मुख्य लॉज ते मिनारेट व्हिस्टा
मिनारेट व्हिस्टावरून मिनारेट ही मॅमोथ लेक्सची प्रसिद्ध स्कायलाइन पाहण्यासाठी स्नोशूइंग मार्ग सर्वाधिक लोकप्रिय आहे. सौम्य चढ असलेल्या या मार्गामुळे नवोदित किंवा मोठ्या मुलांसह कुटुंबांसाठी हा मार्ग चढण्यास सोपा आहे. या ठिकाणी जाण्यासाठी बर्फाच्या स्थितीनुसार नोव्हेंबरच्या मध्यापासून एप्रिलच्या अखेरपर्यंत किंवा त्यानंतरही थोडे दिवस हा मार्ग अनुकूल असतो. या ट्रेलची सुरुवात मॅमोथ माउंटन मेन लॉजवरून होते. हा लॉज 8,909 फुटांवर आहे आणि 2.5 मैलांहून अधिक अंतर चालून गेल्यावर 9,265 फुटांवर या भ्रमंतीची सांगता होते.
मॅमोथ लेकच्या खोऱ्यातील स्नोशूइंग
मॅमोथ लेक्स बेसिन ही पुल, लपलेले अॅम्फीथिएटर, गोठलेली तलावं आणि असीम भूभाग अनुभवण्यासाठी एक उत्तम जागा आहे. या तलावाच्या खोऱ्यातील बहुतेक ठिकाणे क्रॉस-कन्ट्री स्कीइंगसाठी तयार केली आहे तर लेक मेरी विंटर पब्लिक ॲक्सेस कॉरिडॉर हा स्नोशूइंगसाठी लोकांसाठी खुला आहे. 2.5 मैलांचा लेक मेरी विंटर पब्लिक ॲक्सेस कॉरिडॉर हा एक चढ आहे. हा चढ चढल्यावर तुम्ही लेक मेरीपाशी पोहोचता. या ठिकाणी तुम्ही घोड्याची नाल ज्या आकाराची असते त्या आकारातील तलावापर्यंत हा रस्ता सपाट आहे.
मुख्य मार्गाच्या जवळच असलेला पॅनोरामा डोम लूप स्नोशूइंगसाठी उत्तम पर्याय आहे. येथे तुम्हाला मॅमोथ क्रेस्ट, शेरविन डोंगररांग, व्हाइट माउंटन, ग्लास माउंटन, मॅमोथ माउंटन आणि खाली वसलेले मॅमोथ लेक्स शहराचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते.
तामारॅक क्रॉस कंट्री स्की सेंटरच्या पार्किंग क्षेत्रातून सुरू होणारा आणखी एक लोकप्रिय आणि कुटुंबांसाठी अनुकूल मार्ग तलावांच्या काठाने जातो, कॅम्पग्राउंडपर्यंत पोहोचतो आणि तिथून परत येता येते. प्रसिद्ध लावा ट्यूब ‘होल इन द वॉल’ ड्रॅगनच्या पाठीमागील दक्षिणेकडील भागात आहे.
शेडी रेस्ट पार्कमधील स्नोशूइंग
शेडी रेस्ट पार्क हा मॅमोथ लेक्सच्या मध्यभागी सुंदर, सोयीस्कर आणि मोफत स्नोशूइंग मार्ग आहे. कमी उंचीवर असल्यामुळे आणि शहराच्या जवळ असल्यामुळे, येथील स्नोशूइंगचा हंगाम बर्फवृष्टीवर अवलंबून असतो आणि उंच ठिकाणांच्या तुलनेत तुलनेने कमी कालावधीचा असतो.
इन्यो क्रेटर्स
इन्यो क्रेटर्स स्नोशूइंगसाठी एक मनमोहक ठिकाण आहे, जिथे भागाच्या ज्वालामुखीय इतिहासाचा अनुभवही घेता येतो. 3.1 मैल लांबीचा हा मार्ग स्नोशूअर्सना सुमारे 600 वर्षांपूर्वीच्या भव्य शंकूच्या आकाराच्या भूभागापर्यंत नेतो. या भूभागाची निर्मिती शक्तिशाली भूमिगत वाफेच्या स्फोटांनी झाली होती, ज्यामुळे जंगलाची जमीन ढासळली आणि चंद्रासारखी सुंदर भूमी निर्माण झाली.
मॅमोथ लेक्सवरील स्नोशूइंग इव्हेंट्स
स्नोशूइंगसाठी असलेल्या विविध भ्रमणमार्गांव्यतिरिक्त नॅचरलिस्ट स्नोशू टूरमध्ये उत्तम अनुभव मिळतो तसेच या परिसरातील इकोलॉजीचा तपशील समजतो. त्याचप्रमाणे, पौर्णिमेच्या रात्री असलेल्या स्नोशूइंग टूर हा कुटुंबस्नेही पर्याय असून या टूरमध्ये चंद्राच्या चांदण्यात रात्रीचे सौंदर्य अनुभवता येते.
स्नोशूइंगची उपकरणे व साधने मॅमोथ लेक्सवर असलेल्या स्थानिक दुकानांमध्ये भाडेतत्वावर मिळतात.