चिया सीड्सचे सेवन कसे करावे?
चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल, अपुरी झोप, जंक फूडचे सेवन, शरीरात होणारे बदल इत्यादी गोष्टींमुळे आरोग्य बिघडते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र अनेकदा तरीसुद्धा वजन कमी होत नाही. वजन वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करणे, आहारात बदल करून शरीराला पचन होण्याऱ्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात चिया सीड्सचे सेवन कसे करावे? चिया सीड्स खाल्याने शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात चिया सीड्सचे सेवन करू शकता. यामुळे वाढलेले वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होईल. वजन वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. त्यामुळे तुम्ही आहारात चिया सीड्सचे सेवन करू शकता. या बियांमध्ये प्रथिने आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड मोठ्या प्रमाणावर आढळून येते. शिवाय यामुळे भूक नियंत्रणात राहते. चिया सीड्सचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारून चयापचय क्रिया वाढते, ज्यामुळे शरीरातील कमी कॅलरीज बर्न होतात.
वजन वाढल्यानंतर शरीरावर अतिरिक्त चरबी जमा होण्यास सुरुवात होते. यामुळे अनेकदा सीव्हील्स कपडे घालणं सुद्धा नकोस वाटतं. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी चिया सीड्सचे पाणी प्याल्यास वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल. चिया सीड्सचे सेवन करताना कोमट पाण्यात एक चमचा चिया सीड्स रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठल्यावर चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन करा. हा उपाय नियमित केल्यास वाढलेले वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होईल. तसेच चिया सीड्स तुम्ही रस, स्मूदी, पाणी, ओटमील, सॅलड इत्यादी अनेक पदार्थांमध्ये टाकू शकता. यामुळे तुमची बिघडलेली पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होईल.
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात चिया बिया आणि क्विनोआ मिक्स करून ते पाणी उकळून प्याल्यास वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल. चिया सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड, फायबर, प्रोटीन आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळून येतात. शिवाय यामुळे आरोग्य सुधारते. शरीरात साचून राहिलेले विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी आहारात चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन करावे. हे पाणी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.