पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सकाळी उठल्यानंतर अनेक लोक चहा पिऊन दिवसाची सुरुवात करतात. चहा प्याल्याशिवाय त्यांची सकाळचं होत नाही. चहा पिण्याची कोणतीही वेळ नसते, आपल्या मनाला वाटेल तेव्हा किंवा चहाची तालप आल्यानंतर चहा प्यायला जातो. पण दुधाचा चहा आरोग्यसाठी हानिकारक आहे. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी दुधाचा चहा प्यायल्यास आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. रिकाम्या पोटी दुधाचा चहा प्यायल्यानंतर अपचन, जळजळ होणे, असिडिटी इत्यादी अनेक समस्या जाणवतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी इतर पेय प्यावेत जे आरोग्यासाठी गुणकारी आहेत.
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी दुधाचा चहा प्याल्यास बद्धकोष्ठता, सूज येणे, निद्रानाश यांसारख्या समस्या जाणवतात.ल तसेच शरीरातील ऊर्जा कमी होऊन संपूर्ण दिवस कंटाळवाणा जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर चहापाण्याऐवजी कोणते ड्रिंक्स प्यावे, याबद्दल सांगणार आहोत. हे ड्रिंक प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि अपचन ऐकीव असिडिटीचा त्रास जाणवणार नाही.(फोटो सौजन्य-istock)
दुधाचा चहा पिण्याऐवजी ‘हे’ आरोग्यदायी ड्रिंक्स प्या
सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यावे. यामुळे असिडिटी किंवा अपचनाची समस्या उद्भवणार नाही. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने चयापचय आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. तसेच तुम्ही दिवसभरात कधीही लिंबू पाणी पिऊ शकता.
हे देखील वाचा: कोल्ड ड्रिंक्स का ठरतात फॅटी लिव्हरला कारणीभूत? जाणून घ्या
कोरफडचा रस प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. कोरफडचा रस प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. तसेच त्वचा मऊ आणि चमकदार दिसू लागते. चयापचय सुधारण्यासाठी नियमित कोरफडीचा रस प्यावा.
दुधाचा चहा पिण्याऐवजी ‘हे’ आरोग्यदायी ड्रिंक्स प्या
लोहयुक्त गाजर बीटचे सेवन केल्याने शरीराला भरपूर कॅल्शियम आणि लोह मिळते. विटामिन ए, सी आणि ई समृध्द गाजर-बीटरूटचा रस प्यायल्याने प्रतिकारशक्ती वाढून शरीरातील जळजळ कमी होते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी चहा पिण्याऐवजी गाजर बीटरूटचा रस प्यावा.
दुधाचा चहा पिण्याऐवजी ‘हे’ आरोग्यदायी ड्रिंक्स प्या
वाढलेले वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर आहे. ग्रीन टी चे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स, अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉलने समृद्ध असलेली ग्रीन टी शरीरातील पेशींचे होणारे नुकसान टाळण्यासाठी मदत करते. ग्रीन टी मध्ये कॅफिनचे प्रमाण कमी असते.
हे देखील वाचा: सकाळी उठल्यानंतर नियमित मारा दोरीच्या उडया, आरोग्याला होतील ‘हे’ जबरदस्त फायदे
सकाळी उठून चहा पिण्याऐवजी नारळ पाणी प्यावे. नारळ पाण्यात कमी साखर आणि आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे चहा पेक्षासुद्धा गुणकारी आहेत. त्यामुळे निरोगी सकाळी उठल्यानंतर नारळ पाणी प्यावे.