दोरीच्या उडया मारल्याने आरोग्याला होणारे फायदे
सकाळी उठल्यानंतर काही लोक वाढलेले वजन कमी करण्यासाठी दोरीच्या उड्या मारतात. दोरीच्या उड्या मारल्यानंतर वजन कमी होते असा अनेकांचा समाज आहे. पण दोरीच्या उडया मारल्याने आरोग्याला सुद्धा फायदे होतात. काही लोक नुसत्याच दोरीच्या उडया मारतात पण व्यायाम किंवा योगासने करण्यास विसरून जातात. दोरीच्या उडया मारणे हा एक व्यायामातील प्रकार असून वाढलेले वजन कमी करण्यासाठी आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी मारल्या जातात. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला दोरीच्या उडया मारल्याने आरोग्यावर नेमके काय परिणाम दिसून येतात, याबद्दल सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)
दोरीच्या उडया मारल्याने शरीरातील अतिरिक्त कॅलरी कमी होतात. दोरीच्या उडया मारण्यासाठी तुम्ही हलकी दोरी घेऊ शकता. यासाठी कोणत्याही फार महाग आणि फॅन्सी मशीनची आवश्यकता नाही. दोरीच्या उडया मारण्यासाठी व्यवस्थित जागा असायला हवी, अन्यथा दोरी कोणालाही लागू शकते. दोरीच्या उडया मारताना तुम्ही क्रिस क्रॉस, साइड स्विंग, अल्टरनेट फूट जंप करू शकता.
दोरीच्या उडया मारल्याने आरोग्याला होणारे फायदे
रोज सकाळी उठल्यानंतर अर्धातास व्यायाम करावा. त्यानंतर दोरीच्या उडया माराव्यात. दोरीच्या उडया मारल्याने हात मजबूत होतात, स्नायूंचे आरोग्य सुधारते, शरीर अधिक लवचिक होते, कार्डिओ हेल्थ चांगले राहते, हाडे मजबूत होतात, शरीर चपळ होते, शरीराचे संतुलन राखते, कॅलरीज बर्न होतात, चरबी कमी होते, एन्डॉर्फिनला चालना मिळते, वर्कआउटच्या आधी शरीराला वॉर्म अप करते, स्नायूंना टोन करते, उंची वाढवते तसेच चेहऱ्याला आलेली सूज कमी होते.
हे देखील वाचा: सुडौल बांध्यासाठी वापरताय घट्ट ब्रा? होऊ शकतात आरोग्यावर गंभीर परिणाम
दोरीच्या उडया मारल्याने आरोग्याला होणारे फायदे
सकाळी उठल्यानंतर 10 ते 15 मिनिट दोरीच्या उडया मारल्यास वाढलेले वजन कमी होऊन वजन नियंत्रणात राहील. हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी दोरीच्या उडया माराव्यात. तसेच सकाळी उठल्यावर नियमित दोरीच्या उडया मारल्या तर हृदयरोगाचा धोकाही कमी होतो. तसेच फुफ्फुसांना बळकटी मिळून फुफुसांची क्षमता वाढते. दोरीच्या उडया मारल्याने हृदयविकाराचा धोका कमी होऊन मानसिक तणावापासून सुटका मिळते.लहान मुलांना दोरीच्या उडया मारण्यास सांगाव्यात, जेणेकरून त्यांची उंची वाढण्यास मदत होईल.