होळीनिमित्त कुटुंबाला द्या मराठमोळ्या शुभेच्छा, उत्साहाने जीवन जाईल रंगून
हिंदू धर्मातील सर्वच सणांना विशेष महत्व आहे. त्यात अतिशय उत्साहाने साजरा केला जाणारा सण म्हणजे होळी. कोकणातील प्रत्येक गावात वेगवेगळ्या पद्धतीने, परंपरा फॉलो करून होळी साजरा केली जाते. निसर्गाच्या कालचक्रानुसार विविध सण उत्सव साजरा केला जातात. यंदाच्या वर्षी २ मार्चला होळी आहे. यादिवशी राक्षसी होलिकेचे दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी सण साजरा केला जातो. होळीला नैवेद्य दाखवण्यासाठी पुरणपोळीसह इतर विविध गोड पदार्थ बनवले जातात. होळीमध्ये सर्व दुर्गुण जळून जावे अशी प्रार्थना केली जाते. त्यामुळे तुम्हीसुद्धा नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना होळीच्या मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता. या शुभेच्छा वाचून सगळेच आनंदी होतील.(फोटो सौजन्य – istock)
“होळीच्या रंगांमध्ये तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी आणि आरोग्याचे तेज भरून राहो. आनंदाने न्हालेल्या या सणाच्या शुभेच्छा!
“या होळीला स्नेहाचा गुलाल उधळूप्रेमाचे रंग फुलवूआणि मैत्रीची गोडी वाढवूया. होळीच्या हार्दिक शुभेच्छा!”
“गोड गोड गूळपोळी आणि रंगांची उधळण – तुम्हा सर्वांना सुखद आणि आनंदी होळीच्या शुभेच्छा!”
“होळीच्या पवित्र अग्नीमध्येनिराशादारिद्र्य आणि आळस यांचे दहन होवो. तुमच्या आयुष्यात सुखआनंद आणि आरोग्य नांदो! होळीच्या हार्दिक शुभेच्छा!”
रंगीबेरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दृष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला…
सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो
आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख आरोग्य व शांती नांदो…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळी पेटू दे
द्वेष, मत्सर जळू दे
आगामी वसंत ऋतूत
तुमच्या आयुष्यात
सुख-समृद्धीची उधळण होऊ दे!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा
रंग नात्यांचा, रंग बंधाचा
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा
रंग नव्या उत्सवाचा
साजरा करु होळी संगे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
सुखाच्या रंगांनी आपले
जीवन रंगीबेरंगी होवो,
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा
समूळ नष्ट होवो!
होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
आनंद होवो OverFlow
मौजमजा कधी न होवो Low
तुमची होळी साजरी होवो एकदम नंबर One
आणि तुम्ही संपूर्ण आयुष्य करा Lots Of Fun
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळी पेटू दे
रंग उधळू दे
मतभेद मिटू दे
सर्वत्र प्रेमाचा वर्षाव होऊ दे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
ईडापीडा दु:ख जाळी रे
आज वर्षाची होळी आली रे
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगांमध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
“नवयुग होळीचा संदेश नवा
आरोग्य जपा,
झाडे लावा, झाडे जगवा
करूया अग्निदेवतेची पूजा..
होळी सजवा गोव-यांनी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो,
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नष्ट होवो !
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगांमध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
“नवयुग होळीचा संदेश नवा
आरोग्य जपा,
झाडे लावा, झाडे जगवा
करूया अग्निदेवतेची पूजा..
होळी सजवा गोव-यांनी
होळीच्या शुभेच्छा साऱ्यांना”
“होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख,
आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा”
“मत्सर, द्वेष, मतभेद विसरू
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू…
अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे,
आली होळी आली रे!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!”
“टाकून द्या होळीत आयुष्याच्या
अडचणी, चिंता, मनाचा गुंता..
करू होम दु:ख, अनारोग्याचा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा”
“आली रे आली, होळी आली
चला, आज पेटवूया होळी
नैराश्याची बांधून मोळी
दाखवून नैवद्य पुरणपोळीचा
मारूया हाळी…
होळी रे होळी, पुरणाची पोळी
करू आनंदाने साजरी होळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा”






