फोटो सौजन्य: Gemini
देशातील सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार, MG Comet EV आता पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आणि अधिक फीचर्सनी भरलेली आहे. 7.49 लाख (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीसह, ही इलेक्ट्रिक कार कमी बजेटमध्ये ईव्ही खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे. जरी तुम्ही दरमहा 25 ते 30 हजार कमवत असाल तरीही, तुम्ही एमजी कॉमेट ईव्ही सहजपणे ईएमआयवर खरेदी करू शकता. या कारची ऑन-रोड किंमत, ईएमआय आणि फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.
नवीन एमजी कॉमेट ईव्हीची ऑन-रोड किंमत सुमारे 7.82 लाखांपासून सुरू होते. जर तुम्ही 1 लाखाचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला 6.82 लाखांचे कर्ज घ्यावे लागेल. या कर्जावरील व्याजदर दरवर्षी 9.8% आणि परतफेड कालावधी 5 वर्षांचा असेल तर दरमहा किती EMI द्यावा लागेल? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
या गणितानुसार तुम्हाला दर महिन्याला सुमारे 14,425 रुपयांचा EMI भरावा लागेल. अशा प्रकारे 5 वर्षांच्या कालावधीत एकूण सुमारे 8.65 लाख रुपये भरावे लागतील. या रकमेत मूळ कर्जाची रक्कम आणि व्याज दोन्हींचा समावेश आहे. मात्र, वेगवेगळ्या शहरांमध्ये MG Comet EV ची ऑन-रोड किंमत थोडीफार बदलू शकते.
फीचर्स आणि परफॉर्मन्सच्या बाबतीतही MG Comet EV ही कार खूपच आकर्षक आहे. ही एक कॉम्पॅक्ट 4-सीटर इलेक्ट्रिक कार असून ती विशेषतः शहरातील वापर लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे.
‘या’ Electric Bikes तुमचं कॉलेज लाइफ गाजवतील! लूक असा जो भल्याभल्या स्पोर्ट बाईकला लाजवेल
या कारमध्ये 17.3 kWh क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही कार सुमारे 230 किमीपर्यंतची रेंज देऊ शकते. तसेच या कारमध्ये AC फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील उपलब्ध आहे.
सुरक्षा आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेही MG Comet EV मध्ये अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. यात ड्युअल एअरबॅग्स, रिअर पार्किंग कॅमेरा, पॉवर-फोल्डिंग ORVMs, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि डिस्क ब्रेक्ससह ABS + EBD सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे ही कार अधिक सुरक्षित ठरते.






