Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरात माणसं, मनात एकटेपणा! एकाकीपणाच्या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर!

जून २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका जागतिक अभ्यासानुसार भारत हा जगातील दुसरा सर्वाधिक एकाकीपणा अनुभवणारा देश ठरला आहे. ३६ देशांमधील नागरिकांच्या भावनिक आरोग्य, सामाजिक संबंध आणि एकाकीपणाच्या अनुभवांचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 11, 2026 | 06:04 PM
घरात माणसं, मनात एकटेपणा! एकाकीपणाच्या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर!
Follow Us
Follow Us:

जून २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका जागतिक अभ्यासानुसार भारत हा जगातील दुसरा सर्वाधिक एकाकीपणा अनुभवणारा देश ठरला आहे. ३६ देशांमधील नागरिकांच्या भावनिक आरोग्य, सामाजिक संबंध आणि एकाकीपणाच्या अनुभवांचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. डिजिटल मनोरंजन मंच JB.com यांनी प्रसिद्ध केलेल्या या अहवालात तुर्की पहिल्या तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

अहवालानुसार भारताचा “लोनलीनेस स्कोअर” ८९ इतका नोंदवण्यात आला आहे. तुर्कीचा स्कोअर १०० असून त्यानंतर भारत आणि ब्राझीलचा क्रमांक लागतो. भारतातील सुमारे ५८ टक्के नागरिकांनी आपण एकाकीपणाची भावना अनुभवत असल्याचे सांगितले, तर ३४ टक्के लोकांनी सामाजिकदृष्ट्या अलिप्त असल्याचे नमूद केले आहे.

आत्मसमाधान हीच खरी समृद्धी…! मन शांत आणि आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी ‘हे’ प्रेरणादायी विचार नक्कीच ठरतील प्रभावी

विशेष म्हणजे भारतात संयुक्त कुटुंबपद्धती आणि कौटुंबिक नातेसंबंध अजूनही मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहेत. देशातील केवळ ३.७ टक्के घरे ही एकट्या व्यक्तीची आहेत आणि सरासरी कुटुंबाचा आकार चारपेक्षा अधिक सदस्यांचा आहे. तरीही लोकांमध्ये एकाकीपणाची भावना वाढत असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

अहवालात नमूद करण्यात आले आहे की भारतातील एकाकीपणा हा प्रामुख्याने शारीरिक नसून भावनिक स्वरूपाचा आहे. म्हणजेच अनेक लोक कुटुंबीयांसोबत किंवा इतर सदस्यांसोबत राहत असले तरी त्यांना भावनिक आधार, समजून घेणारे संबंध किंवा संवादाची कमतरता जाणवते. त्यामुळे गर्दीतही एकटे असल्याची भावना निर्माण होत आहे. याशिवाय भारतातील ३७ टक्के नागरिक वारंवार दुःखी असल्याचे आढळून आले आहे. हा आकडा पहिल्या पाच क्रमांकावरील देशांमध्ये सर्वाधिक आहे. यामुळे मानसिक आरोग्याशी संबंधित आव्हाने आणि भावनिक ताणतणाव वाढत असल्याचे संकेत मिळतात.

डाएटसाठी उत्तम मानली जातात भारतातील ‘ही’ युनिक फळे, चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा आहेत खूप जास्त फायदेशीर

दरम्यान, तुर्कीमध्ये ६१ टक्के लोकांनी एकाकीपणा जाणवत असल्याचे सांगितले असून ४५ टक्के लोक स्वतःला सामाजिकदृष्ट्या वेगळे समजतात. तेथे जवळपास प्रत्येक पाचपैकी एका घरात एकच व्यक्ती राहते. मात्र भारताच्या बाबतीत कुटुंबीयांसोबत राहूनही भावनिक तुटलेपणा वाढत असल्याची बाब अधिक चिंताजनक मानली जात आहे. हा अभ्यास आधुनिक जीवनशैली, डिजिटल संवाद, वाढती स्पर्धा आणि कमी होत चाललेले प्रत्यक्ष मानवी संबंध यामुळे मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधतो. त्यामुळे भावनिक आरोग्य, संवाद आणि सामाजिक संबंध अधिक मजबूत करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Web Title: India comes on 2nd number of lonliest countries

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 06:04 PM

Topics:  

  • india
  • mental health

संबंधित बातम्या

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?
1

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात
2

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
3

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच
4

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.