Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गॅस सिलेंडरच नाही, रेल्वेतून या वस्तू नेण्यासही आहे मनाई, तुम्हाला नियम माहिती आहेत का?

Indian Railway Rules : भारतीय रेल्वेत प्रवास करताना काही वस्तू गाडीतून नेण्यास मनाई असते. रेल्वे नियमांचे उल्लंघन केल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो आणि कायदेशीर कारवाईसही तुम्ही पात्र ठरु शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 29, 2026 | 08:13 AM
गॅस सिलेंडरच नाही, रेल्वेतून या वस्तू नेण्यासही आहे मनाई, तुम्हाला नियम माहिती आहेत का?

गॅस सिलेंडरच नाही, रेल्वेतून या वस्तू नेण्यासही आहे मनाई, तुम्हाला नियम माहिती आहेत का?

Follow Us
Follow Us:
  • रेल्वेत गॅस सिलेंडर नेण्यास मनाई
  • पेट्रोल, फटाके आणि स्फोटक वस्तूंवर बंदी
  • नियम मोडल्यास दंडासह तुरुंगवासाची शक्यता
रेल्वेचा प्रवास आरामदायी होण्यासोबतच परवडणारा प्रवास म्हणूनही ओळखला जातो. दररोज हजारो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. आपल्या या यात्रेत अनेकजण आपल्यासोबत काही समान वाहून नेतात. हे समान रेल्वेतून नेण्यासाठी रेल्वेचे काही खास नियम आहेत. तुम्हाला हे नियम माहिती आहेत का? माहिती नसेल तर चला आता हे नियम माहिती करून घेऊयात. हे खरं आहे की, रेल्वेतून काही समान वाहून नेण्यासाठी रेल्वेचे खडक नियम आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास तुम्हाला कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागू शकतो. यासाठीच रेल्वेचे काही खास नियम आधीच माहिती असणे अनिवार्य आहे.

जनरल तिकिटासाठी स्टेशनला जाण्याची गरज नाही, मोबाईलवरच 1 मिनिटांत होईल बुक; रेल्वे देते 3% सूट

एलपीजी सिलेंडर आणि गॅस स्टोव्ह

अनेकदा लोक खास करुन प्रायव्हेट टुरुस्ट ग्रुप्स, आपल्यासोबत ट्रेनमध्ये एलपीजी सिलेंडर आणि स्टोव्ह घेऊन प्रवास करतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, असं केल्यास रेल्वे नियमांचे उल्लंघन होऊ शकते. मागेच एक अशी घटना घडली होती. पुनालूर-मदुराई एक्सप्रेसमध्ये एका खाजगी पर्यटकाने डब्यात बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडर आणि स्टोव्ह नेल्यामुळे गाडीत भीषण आग लागली होती. या अपघातामुळे अनेक लोकांचा बळी गेला.

एलपीजीत ज्वलनशील गॅस असते. जर गर्दीच्या रेल्वेत गॅस सिलेंडरमधील गॅस लीक झाली तर मोठा अपघात घडून येऊ शकतो. रेल्वे मॅन्युअलच्या कलम ९ नुसार, खाजगी पर्यटक गटांना एक लेखी घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे, ज्यात त्यांनी प्रवासादरम्यान कोणतीही ज्वलनशील वस्तू सोबत नेणार नसल्याचे नमूद केलेले असते. यामुळेच कोणत्याही परिस्थितीत रेल्वेत गॅस सिलेंडर नेण्यास मनाई आहे.

पेट्रोल, ॲसिड आणि फटाके नेण्यास बंदी

गॅस सिलेंडर व्यतिरिक्त रेल्वेत कोणत्याही प्रकारचे ज्वलनशील किंवा स्फोटक पदार्थ नेण्यास मनाई आहे. असं केल्यास तुम्हाला दंड देखील भरावा लागू शकतो. तुम्ही रेल्वेत पेट्रोल, केरोसीन, डिझेल, थर्मिट वेल्डिंग उपकरणे किंवा कोणत्याही प्रकारचे फटाके नेऊ शकत नाही. याशिवाय रेल्वेत धारदार शस्त्रे जसे की, चाकू, कट्यार, विना लायसंस बंदूक किंवा दारुगोळा बाळगण्यासही मनाई आहे. या गोष्टी धोकादायक असल्याने रेल्वेत गर्दीच्या ठिकाणी अशा साधनांमुळे अपघात किंवा भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते.

सुंदर आणि रहस्यमय… अमर लोकांच्या पुलाची कथा, जाणून घ्या कुठे आहे Bridge Of The Immortals

नियम तोडल्यास होईल तुरुंगवास

जर कोणत्या प्रवाशाने या नियमांचे उल्लंघन केले तर त्याच्यावर भारतीय रेल्वे कायदा १९८९ च्या कलम ६७, १६४ आणि १६५ अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. या नियमांचे उल्लंघन केल्यास तुमच्यावर कडक कायदेशीर कारवाई होऊ शकते. यासाठी तुम्हाला दंड भरावा लागू शकतो आणि ३ वर्षांचा तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.

Web Title: Indian railway luggage rules prohibited items lpg cylinder petrol firecrackers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 08:13 AM

Topics:  

  • Indian Railway
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

सुंदर आणि रहस्यमय… अमर लोकांच्या पुलाची कथा, जाणून घ्या कुठे आहे Bridge Of The Immortals
1

सुंदर आणि रहस्यमय… अमर लोकांच्या पुलाची कथा, जाणून घ्या कुठे आहे Bridge Of The Immortals

MakeMyTrip Axis Bank Offer : फिरण्याचा प्लॅन करताय? मेकमायट्रिप अन् ॲक्सिस बँक देतंय मोठं डिस्काउंट, मिळणार बंपर सूट
2

MakeMyTrip Axis Bank Offer : फिरण्याचा प्लॅन करताय? मेकमायट्रिप अन् ॲक्सिस बँक देतंय मोठं डिस्काउंट, मिळणार बंपर सूट

स्वर्गापेक्षाही सुंदर! ढगांच्या कुशीत वसलंय हे सुंदर गाव, थांबी व्ह्यू पॉइंटवरून दिसतं कांचनजंगाचं अद्भुत रूप
3

स्वर्गापेक्षाही सुंदर! ढगांच्या कुशीत वसलंय हे सुंदर गाव, थांबी व्ह्यू पॉइंटवरून दिसतं कांचनजंगाचं अद्भुत रूप

Amrit Bharat 3.0 : आता सर्वसामान्यांना मिळणार वंदे भारतचा अनुभव, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा! अमृत भारत 3.0 मध्ये काय खास?
4

Amrit Bharat 3.0 : आता सर्वसामान्यांना मिळणार वंदे भारतचा अनुभव, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा! अमृत भारत 3.0 मध्ये काय खास?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.