Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel : परदेशात कशाला जायचं? भारताच्या या ठिकाणी मिळतो Venice चा फिल, कुठे आहे ते जाणून घ्या

Veliyanad : शांत वातावरण आणि नैसर्गिक साैंदर्याने तुडुंब भरलेले हे ठिकाण एका वेगळ्याच जगात गेल्याचा फिल देते. कमी पैशांत परदेशी पर्यटनाचा फिल घ्यायचा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 03, 2026 | 08:35 AM
Travel : परदेशात कशाला जायचं? भारताच्या या ठिकाणी मिळतो Venice चा फिल, कुठे आहे ते जाणून घ्या

Travel : परदेशात कशाला जायचं? भारताच्या या ठिकाणी मिळतो Venice चा फिल, कुठे आहे ते जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • भारतातील एक अनोखे ठिकाण आपल्या वेगळ्या भौगोलिक रचनेमुळे पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहे.
  • पाण्याने वेढलेले रस्ते, शांत वातावरण आणि निसर्गरम्य दृश्यांमुळे येथे वेगळाच प्रवासाचा अनुभव मिळतो.
  • कमी बजेटमध्ये परदेशासारखा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी हे ठिकाण उत्तम पर्याय मानले जाते.
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे फिरण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत. मुख्य म्हणज भारताच्या प्रत्येक राज्यात गेल्यावर एका वेगळ्या जगात गेल्याचा भास होऊ लागतो. अशात थोडा वेळ काढून तुम्ही देशातील प्रत्येक कोपरा फिरायला हवा. आम्ही तुम्हाला आज देशातील एक असे ठिकाण सांगणार आहोत जिथे गेल्यावर वेनिस देशात गेल्याचा भास होऊ लागतो. येथील दृष्य इतके सुंदर आहे की आपल्याला वाटते जणू आपण कोणत्या दुसऱ्या देशात प्रवेश केला आहे. कमी बजेटमध्ये जर तुम्हाला परदेशी यात्रेचा अनुभव घ्यायचा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी एक परफेक्ट पर्याय ठरेल. चला हे ठिकाण नक्की कुठे आहे ते सविस्तर जाणून घेऊया.

गोव्याला जाऊन कंटाळलात? मग यावेळी निवडा पदुचेरीचा पर्याय, फक्त मंदिर आणि बीच नाही इथे फिरण्यासाठी आहेत असंख्य ठिकाणे

भारतात कुठे वसले आहे हे ठिकाण?

या लेखात आम्ही तुम्हाला सांगत असलेले हे ठिकाण म्हणजे वेलियानाड. केरळच्या अलप्पुझा जिल्ह्यातील कुट्टनाड क्षेत्रात वसलेले हे एक अतिशय सुंदर आणि नैसर्गिक साैंदर्याने नटलेले ठिकाण आहे. हे ठिकाण खरंतर आपल्या पाण्याच्या रस्त्यांमुळे जगभर प्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला जमिन समुद्र तळाच्या खाली दिसेल. रस्त्याच्या चारही बाजूला इथे पाणी भरलेलं असतं ज्यामुळे पाहताना अनेकदा असं वाटतं जणू आपण पाण्याच्या रस्त्यावर चालत आहोत. इथे व्हिडिओज आणि फोटोज फार सुंदर येतील.

ठिकाणाला वेनिस का म्हटलं जातं?

या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या सभोवताली वाहणारे पाण्याचे प्रवाह आहे. इथे सामान्य रस्त्यांसारखे नाही तर पाण्याने भरलेले अनोखे रस्ते पाहता येतात जे तुम्ही इतर कुठेही पाहिले नसावे. गावातील घरांच्या सभोवताली वाहणारे पाणी ठिकाणाचे खास आकर्षण आहेत. नैसर्गिक सुंदरता आणि अनोख्या रचनेमुळे या ठिकाणाला वेनसची उपमा देण्यात आली आहे.

इथे कोणकोणत्या गोष्टींचा आनंद लुटता येऊ शकतो?

  • बॅकवॉटर बोटिंगचा आनंद
  • अद्भुत हाऊसबोटचा अनुभव
  • निसर्गासोबत फोटो काढण्याचा आनंद
  • यासोबतच गावाकडच्या शांत जीवनाचा आनंद इथे घेता येईल
फिरण्यासाठीची योग्य वेळ कोणती?

इथे फिरण्यासाठीचा सर्वात उत्तम काळ ऑक्टोंबर ते मार्च दरम्यानचा आहे. या दरम्यान वातावरण एकदम आल्हाददायी असते. त्याचबरोबर मे-जून या काळात इथ फार गर्दी नसते, त्यामुळे याकाळात तुम्ही या ठिकाणाला भेट देण्याचा प्लॅन करु शकता.

IRCTC चे नवे टूर पॅकेज लाँच; 17,000 हून कमी पैशात करा अयोध्या, काशी आणि पुरीची सफर

कसं पोहचायचं?

  • मुंबईहून वेलियानाडला जाण्यासाठी विमान, रेल्वे आणि रस्ता हे तीनही पर्याय उपलब्ध आहेत.
  • विमान – यासाठी तुम्हाला मुंबईहून कोचीला यावे लागेल. इथून टॅक्सी किंवा बस करुन तुम्ही वेलियानाड गाठू शकता.
  • रेल्वे – मुंबईहून एर्नाकुलम जाण्यासाठी थेट गाड्या उपलब्ध आहेत. एर्नाकुलम स्टेशनवर पोहचल्यावर तिथून बस किंवा टॅक्सी करुन वेलियानाडला पोहचा.
 

Web Title: Indias hidden venice like destination in kerala veliyanad backwater village travel guide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 08:34 AM

Topics:  

  • Kerala
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

जन्माष्टमीला मथुरा-वृंदावनाला जात असाल तर या 4 ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका
1

जन्माष्टमीला मथुरा-वृंदावनाला जात असाल तर या 4 ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका

Matheran News: पर्यटननगरी माथेरान अंधारात! अनेक पथदिवे बंद; रात्री पर्यटकांची गैरसोय
2

Matheran News: पर्यटननगरी माथेरान अंधारात! अनेक पथदिवे बंद; रात्री पर्यटकांची गैरसोय

नवीन ट्रॅव्हल थेरपी! ना नेटवर्क, ना नोटिफिकेशन… भारतातील सायलंट टुरिस्ट ठिकाणं जाणून घ्या
3

नवीन ट्रॅव्हल थेरपी! ना नेटवर्क, ना नोटिफिकेशन… भारतातील सायलंट टुरिस्ट ठिकाणं जाणून घ्या

Ferry Boat : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबई-अलिबाग फेरीबोट सेवा १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू
4

Ferry Boat : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबई-अलिबाग फेरीबोट सेवा १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.